‘ठाकरे’शिवाय कोणताही चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होऊ देणार नाही – बाळा लोकरे 

मुंबई – शिसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी प्रदर्शित झाला. या पार्श्वभूमीवर २५ जानेवारीला ‘ठाकरे’शिवाय अन्य कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा थेट इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला आहे.

बाळा लोकरे म्हणाले कि, २५ जानेवारीला ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. कोणी चित्रपट प्रदर्शित केल्यास त्याला शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झाँसी हा चित्रपटही २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. परंतु, लोकरे यांच्या इशाऱ्यानंतर निर्माते चित्रपटाची तारीख बदलतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)