ठाकरवाडी झेडपी शाळेची पटसंख्या वाढतेय

राजगुरूनगर – राज्यात आदिवासी भागात रोल मॉडेल ठरणारी ठाकरवाडी (वेताळे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेशोउत्सव साजरा करण्यात आला. एकीकडे मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना येथील प्राथमिक शाळेत मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढच होत आहे. आदिवासी भाग असूनही शिक्षणाकडे पालकांचा असलेला कल वाढत असल्याने येथील चौथीपर्यंतची शाळा आता सातवीपर्यंत झाली आहे. तर 2018-19 या नवीन शैक्षणिक वर्षांत ठाकरवाडी मधील पहिलीच्या 12 पैकी तीन मुले व सहा मुलीं अशा नऊ विद्यार्थ्यांचा प्रवेश नुकताच झाला आहे. त्यांचा शाळेत प्रवेश मोठ्या थाटामाटात करण्यात आला. तर मुलांची गावातून फेटे बांधून ठाकरी पद्धतीची मिरवणूक काढून त्यांना शाळेत पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मधुकर पारधी, माजी ग्रामपंचायत सदस्य बबन पारधी, प्रताप पारधी, रमेश खंडवे, सुरेश मधे, प्रशांत पारधी, सुशीला मधे, इंदूबाई पारधी, सुनीता पारधी, छाया केदारी, ताईबाई मधे, शिक्षक साविता उगले, ज्ञानेश्वर तळेकर यांच्यासह ठाकरवाडीतील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेच्या या शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांना फेटे बांधून त्यांना सर्व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
ठाकरवाडीच्या प्राथमिक शाळेत मागील शैक्षणिक वर्षात (2017-2018) तालुक्‍यात सर्वाधिक म्हणजे 79 मुले पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण घेत आहेत. कधीकाळी या ठाकरवाडीत जिप शाळा होती. शाळेत येणे हे येथील मुलांसाठी केवळ नावापुरतेच होते. अबक आणि हे शब्द त्यांना शाळेत ऐकायला मिळत नव्हते. शाळा भरत होती; परंतु शाळेत मुले दिसत नव्हती. मात्र, 15 वर्षांपूर्वी येथल शाळेला संदीप जाधव हे शिक्षक लाभले आहे आदिवासी ठाकर समाजातील मुलांच्या जीवनाला उजाळा मिळाला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून व सामाजिक क्षेत्रातून या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत मिळत गेली. मुंबई माता बाल संगोपन केंद्राने येथील ठाकरवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला. सामाजिक जाणीव म्हणून या संस्थेच्यावतीने येथील आदिवासी ठाकर सामाज बांधवांमध्ये एक आशेचा किरण निर्माण करून दिला. ठाकरवाडी वेताळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आता 88 विद्यार्थी बसणार आहेत. तीन शिक्षक येथे ज्ञानदानाचे काम करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)