ठरले! अखेर जलसंपदा विभागाला 48 कोटी देणार

संग्रहित छायाचित्र

जायका योजनेचा निधी वर्गीकरण महापालिकेची मंजुरी


पहिल्या टप्प्यात दिले जाणार 17 कोटी रुपये

पुणे – जादा पाणी वाटपापोटी जलसंपदा विभागास 17 कोटी देण्याच्या खर्चास शुक्रवारी झालेल्या मुख्यसभेत मान्यता देण्यात आली. जलसंपदा विभागाकडून पालिकेकडे 395 कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यावरून वाद निर्माण झाले. यावर बैठका झाल्यानंतर अखेर 48 कोटींचा निधी देण्यावर तोडगा निघाला आहे.

महापालिकेने जलसंपदा विभागाला द्यावयाच्या 48 कोटींमधील 17 कोटी रुपयांचा पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत. मात्र, हे पैसे देण्याचा प्रस्ताव चुकीचा असून ही रक्कम देऊ नये अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली पाण्याचा तुटवडा असताना पाणी जादा वापर झालाच कसा? अशी विचारणा त्यांनी केली. चुकीच्या पद्धतीने हा निधी दिला जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. तर नगरसेवक सुभाष जगताप यांनी महापालिकेने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारला असताना ते पाणी जलसंपदला दिले जाते, मग वाढीव पाणी का मिळत नाही? अशी विचारणा केली.

यावेळी प्रशासनाच्या वतीने पाणी पुरवठा विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी याचा खुलासा केला. जलसंपदा विभागाने महापालिकेस यापूर्वी असलेला औद्यीगिक पाणी वापर 3 टक्के होता तो 8 टक्के झाला आहे. त्यामुळे या वाढलेल्या औद्योगिक पाणी वापराचा फरक मागितला आहे. जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निकषानुसार हा निधी मागण्यात आला आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने 395 कोटी मागितले असले, तरी महापालिका केवळ 47 कोटींचा निधी देण्यास तयार आहे. त्यानुसार, हा 17 कोटींचा हप्ता देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

त्यानंतर जलसंपदा विभाग “ब्लॅकमेल’ करत असून याप्रकरणी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हा विषय मार्गी लावावा, अशी मागणी महापौरांनी केली.

नदीसुधारचे पैसे का वळविले?
जलसंपदा विभागाची थकबाकी देण्यासाठी महापालिकेकडून मुळा- मुठा नदी संवर्धनासाठीच्या निधीतून 15कोटींचा निधी वळविण्यात आला आहे. त्यास अरविंद जगताप यांनी आक्षेप घेतला, मात्र, नदी सुधारणा योजनेचे काम सुरू होण्यास जून उजाडणार आहे. त्यामुळे हा निधी दिल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

आंबेगाव खुर्दचे वीजबिल थकल्याने गावाचा पाणीपुरवठा बंद असल्याचे मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच गावे येऊन पाच महिने झाले, तरी पाणी देऊ शकत नाही. तर गावे घेतलीच कशाला? अशी विचारणा मोरे यांनी केली. त्यावेळी या गावाचे बिल तातडीने देऊन उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)