‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मध्ये ‘असा’असेल आमीरचा लुक

या वर्षातील सर्वात बहुचर्चित चित्रपट ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ यामधील सर्व मुख्य पात्रांचे लुक ट्विटरवर मोशन पिचरच्या माध्यमातून ट्विट करत आमीर खानाने चित्रपट प्रमोट करण्याचा वेगळाच रास्ता अवलंबला आहे. त्याने ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मधील स्वतःचा देखील लुक ट्विट केला. त्याने अगोदर महानायक अमिताभ बच्चन, कतरिना कैफ यांच्या देखील पत्राचा नवीन लुक ट्विट केला होता.

स्वतःच्या ट्विटमध्ये त्याने असे लिहले की, “हा मी आहे, फिरंगी मल्लाह. माझ्यासारखा प्रामाणिक तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. ‘सच्चाई’ माझे दुसरे नाव आहे आणि ‘भरोसा’ माझे काम आहे.”

-Ads-

या अगोदर त्याने’ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातील मुख्य पात्र अमिताभ बच्चन याचे ‘खुदाबख्श’, फातिमा सना शेखचे ‘जफिरा’ आणि कतरीना कैफचे ‘सुरैया’ या सर्व पात्रांचे मोशन पिचर रिलीज केले होते.

आमीरने अमिताभ बच्चन यांचा लुक करताना  ट्विटमध्ये म्हटले की, ‘सर्वात मोठा ठग’. या ट्विटमध्ये दाखवण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन यांच्या पात्राचे नाव देखील सांगितले लागेल असून त्यांचे नाव यात  ‘खुदाबक्ष’ असणार आहे. हा यशराज बॅनरचा चित्रपट असून हा चित्रपट दिवाळीचे मुहूर्त साधून चित्रपटगृहात दाखल होणार आहे. याची प्रदर्शनाची तारीख ८ नोव्हेंबर अशी सध्यतरी निश्चित आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)