‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चे नवीन पोस्टर रिलीज

बॉलीवूडचा मिस्टर परफेक्टशिस्ट आमिर खान आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे दिवाळीमध्ये रिलीज होत असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात प्रथमच एकत्र काम करणार आहे. मागील आठवड्यापासून या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर प्रदर्शीत केली आहे त्यामध्ये सर्व टीम एकत्र दिसत आहे.  यामध्ये अमिताभ बच्चन, अमीर खान, कतरीना कैफ, फातिमा सना शेख हे सारे स्टार प्रथमच एकत्र दिसत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमिर खानने स्वतःच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून हे पोस्टर पोस्ट केले. त्याचबरोबर त्याने त्या पोस्टमध्ये असे लिहले आहे की, ” मी स्वतःला अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका पोस्टरमध्ये पाहणे एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. मला अजूनही विश्वास बसत नाही.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)