“ठग्स’ ऑफ हिंदोस्तानवर मुंबई पोलिसांची करडी नजर 

मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅडलवरून विविध मीम बनवून नागरिकांमध्ये जागरूकता आणि त्यांना सर्तक केले जात असते. या ट्‌वीट्‌ससाठी कधी-कधी चित्रपटातील संवाद आणि दृश्‍यांचा आधार घेण्यात येत असतो. मुंबई पोलिसांनी असाच एक मीम “ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटातून तयार केला आहे. यावर आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया दिली असून हा मीम खूपच लोकप्रिय होत आहे.
मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅडलवर शेअर केलेल्या मीममध्ये “ठग्स ऑफ हिंदोस्तान’मधील एक संवाद घेतला आहे. ज्यात आमिर म्हणतो, धोका देणे माझी खुबी आहे. तर याला प्रत्युत्तर देत अमिताभ म्हणतात, विश्‍वास करणे माझी. या मीममध्ये एका बाजूला आमिर खानचा फोटो, तर दुस-या बाजूला समुद्रात गस्त देताना पोलिसांचे जहाज दाखविण्यात आले आहे. आमिरच्या फोटोसोबत लिहिले की, धोका देणे माझा स्वभाव आहे. तर जहाजाच्या फोटोसोबत लिहिले की, आणि विश्‍वास करणे आमचा.
यावर आमिर प्रतिक्रियात दिली की, तसे तर तुमचा स्वभाव शंका करणे, दिवस-रात्र पहारा आणि सतर्कता बाळगणे आहे. त्यामुळेच आमचा तुमच्यावर विश्‍वास आहे. अभिमान आहे. “ठग्स ऑफ हिंदोस्तानमधील खुदाबख्श अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, हे खरचं आहे. मंबई पोलिसांचा सर्वांनाच आदर आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)