“ठग्ज…’च्या अपयशाचा “धूम 4’वर परिणाम ?

अलिकडेच रिलीज झालेला “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ बॉक्‍स ऑफिसवर फारच वाईट पद्धतीने आपटला आहे. अजूनही “ठग्ज…’चे कलेक्‍शन जरी सुरू असले तरी त्यामध्ये अपेक्षित वाढ होण्याची कोणतीही शक्‍यता आढळून येत नाही.
सिनेमाच्या अपयशाबद्दल कोणा एकाला जबाबदार धरणे ही तर बॉलिवूडची खूप जूनी परंपरा आहे. हे अपयशाचे खापर दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांच्या डोक्‍यावर फोडले जाणे हे जवळपास निश्‍चित आहे. विजय कृष्ण आचार्य यांनी
“ठग्ज…’साठी कथा, पटकथा, संवाद आणि गीतांचे लेखनही केले आहे.

याबरोबरच त्यांनीच या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते. सिनेमातील सर्व प्रमुख विभागांशी त्यांचा थेट संबंध होता. त्यामुळे अपयशाची जबाबदारी त्यांच्यावर येणे स्वाभाविक आहे. विजय कृष्ण आचार्यवर यशराज फिल्म्सच्या आदित्य चोप्राचा खूप विश्‍वास आहे. “धूम’ आणि “धूम 2′ ची पटकथाही आचार्यनीच लिहीली होती.

हे दोन्ही सिनेमे खूप हिट झाले होते. पण याशिवाय आचार्य यांनी दिग्दर्शित केलेली”टशन’तर आपटलाच होता आणि “धूम 3’लाही फार काही यश मिळाले नव्हते. आता “धूम 4’बाबत आदित्य चोप्रा कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. त्यामुळे “धूम 4′ ची जबाबदारी दुसऱ्या कोणावर तरी सोपवली जाण्याची शक्‍यता अधिक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
12 :thumbsup:
3 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
1 :blush:
30 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)