ठग्ज ऑफ हिंदुस्थानचे कलेक्‍शन घसरले 

आमिर खान आणि अमिताभ बच्चन यांच्या “ठग्ज ऑफ हिंदुस्थान’कडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. मात्र सिनेमा रिलीज झाल्यापासून सर्वचजण या सिनेमावर जोरदार टीका करत सुटले आहेत. विश्‍लेषकांनीही सिनेमाचे रेटिंग खूपच खालच्या दर्जाचे दर्शवले आहे. या सगळ्या धामधुमीमध्ये गेल्या 3-4 दिवसात “ठग्ज…’ने तब्बल 100 कोटी रुपयांचा धंदा केला आहे. मात्र लगेचच सिनेमाचे कलेक्‍शन घसरायला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी 52 कोटी रुपयांचे ओपनिंग करणाऱ्या “ठग्ज…’चे कलेक्‍शन दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसापासूनच कमी झाले होते. आता एकदम 22 कोटींवर कलेक्‍शनचा आकडा घसरला आहे. आता 300 कोटींचे बजेट सिनेमा बॉक्‍स ऑफिसवर वसुल करू शकेल की नाही, याचीही शाश्‍वती देता येत नाही.

“ठग्ज…’ जगभर 700 स्क्रीनवर एकाचवेळी रिलीज झाला. त्यातही सिनेमाचे तमिळ आणि तेलगूमध्येही डबिंग झाले आहे. म्हणजे दक्षिणेतही “ठग्ज…’ रिलीज झाला आहे. हे सगळे असूनही 52 कोटी रुपयांचेच ओपनिंग मिळाले होते. आता टिव्ही शो चे हक्क आणि जगात अन्यत्र रिलीज झाल्यावर मिळणाऱ्या कलेक्‍शनचे आकडे अजून समोर यायचे आहेत. दिवाळीचा सीझन आणि दोन सुपरस्टार असूनही “ठग्ज…’वर ही वेळ यावी, हे दुर्दैव आहे. सुमार कथा हे त्याचे कारण सांगितले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
1 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)