ट्‌विटर-फेसबुकने दहशतवाद्यांच्या पोस्ट्‌स एका तासात काढून टाकाव्या – युरोपियन युनियन

स्ट्रॉसबर्ग (फ्रान्स) – ट्विटर आणि फेसबुकने दहशतवाद्यांच्या पोस्ट्‌स एका तासात काढून टाकल्या पाहिजेत. तसे न केल्यास त्यांना मोठा दंड करण्यात येणार आहे. युरोपियन युनियनने या साठी एक नवीन कायदा केला आहे. आधिकाऱ्यांकडून आदेश मिळाल्यानंतर एका तासाच्या आत सोशल नेटवर्क आणि वेबसाईट्‌सवर असलेल्या दहशवाद्यांच्या पोस्ट डीलिट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. युरोपियन आयोगाचे अध्यक्ष ज्यां क्‍लाऊड जंकर यांनी ही माहिती दिली आहे.

दहशतवाद्यांना आपल्या हल्ल्यांना अंतिम रूप देण्यासाठी सोशल नेटवर्क एक प्रमुख साधन बनले आहे. अलीकडच्या काळात युरोपात दहशतवादी हल्ल्यांमध्ये शेकडो लोक मारले गेले आहेत.

आपल्या सुरक्षिततेसाठी युरोपियन जनता युरोपियन युनियनकडून वाजवी अपेक्षा करत आहेत, त्यामुळेच हा कठोर निर्णय घेण्यात आलेला आहे. असे त्यांनी सांगितले.

एका जानेवारी महिन्यातच दहशतवाद्यांनी 7000 प्रचार साहित्य ऑनलाईन प्रसारित केले. त्यामुळेच प्राधिकृत अधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर एका तासाच्या आत दहशतवादी सहित्य डीलिट करणे बंधनकारक करण्याचा कायदा पास करण्यात आला आहे.

दहशतवादी कारवाया करण्यासाठी उद्युक्त करणारे, हल्ल्यासाठी सूचना देणारे, त्याचे समर्थन करणारे, दहशतवादी गटांच्या कारवायांना प्रोत्साहित करणारे साहित्य हे दहशतवादी साहित्य समजण्यात येणार आहे.

आदेशानंतरही असे साहित्य डीलिट न केल्यास त्या त्या देशातील कायद्यानुसार प्रभावी, प्रतिरोधात्मक आणि आनुपातिक शिक्षेची तरतूद केली पाहिजे. असे स्पष्ट करण्यात आले असून आदेशाचे पालन न करणाऱ्या सेवा प्रदात्यास मागील वर्षाच्या एकूण उलाढालीच्या चार टक्केपर्यंत दंड भरावा लागू शकेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)