ट्‌विटरवरही रंगलाय साहित्याचा मेळा

#ट्‌विटरसंमेलनचा “ट्रेंड’ : “प्रकट व्हा, अभिव्यक्‍त व्हा’!

प्रसाद खेकाळे

पुणे –
यवतमाळमध्ये 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रंगले असताना दुसरीकडे ट्‌विटरवरही साहित्याचा मेळा जमला आहे. 11 ते 13 जानेवारी या कालावधीत चौथ्या “ट्‌विटर मराठी भाषा संमेलन 2019′ चे आयोजन करण्यात आले असून युवावर्गाचा त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ट्‌विटर हे एक जागतिक व्यासपीठ आहे. यावर रोज कोट्यवधी लोक आपले मत आपल्या भाषेत नोंदवतात. एकेकाळी फक्‍त इंग्रजीचा बोलबाला असणारे ट्‌विटर आज जगातील प्रत्येक लिपी असणारी भाषा सामावून घेत आहे. मग, अशा ह्या ट्‌विटरवर मराठीचे अस्तित्व किती आहे? असा प्रश्‍न सर्वांनाच पडेल. सध्या मराठीचे ट्‌विटरविश्‍व जोमाने विस्तारत आहे व त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. मराठीचे ट्‌विटरविश्‍व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज भरपूर ट्‌विट्‌स लिहिले जावेत, या ध्येयातूनच ट्‌विटरसंमेलन या संकल्पनेचा जन्म झाला. यंदा या संमेलनाचे चौथे वर्ष आहे.

दि. 11, 12 आणि 13 असे दिवस वेगवेगळ्या हॅशटॅगचा वापर करुन ट्‌विटर वापरणारे लोक या संमेलनामध्ये सहभागी होऊ शकतात. संमेलनाबद्दल @Marathiword या ट्‌विटर अकाउंटवर याबद्दल अधिक माहिती देण्यात आली आहे.
संमेलनाचा मुख्य “हॅशटॅग’ ट्‌विटरसंमेलन आहे. याशिवाय अन्य बारा “हॅशटॅग’ असून त्यापैकी एक निवडून तुम्ही ट्‌वीट करू शकता. कविता, ब्लॉग, कथा, छंद अशा विविध गोष्टींविषयी ट्‌वीट शेअर करण्यास सांगण्यात आले आहे.

हे आहेत “हॅशटॅग’

#माझीकविता, #ट्‌विटकथा, #माझाब्लॉग, #माझीबोली, #साहित्यसंमेलन, #वाचनीय, #हायटेकमराठी, #बोलतोमराठी, #मराठीशाळा, #भटकंती, #खमंग #माझेवेड
 
नवसाहित्याचा जन्म

ट्‌विटर संमेलनाला मराठी ट्विटर युझर्सनी गेली तीन वर्षे भरघोस प्रतिसाद दिला आहे. भारतासह परदेशातील मराठी ट्‌विटर युझर्सनी ट्‌विटर संमेलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्यामुळे हजारो कविता, चारोळी आणि कथांचा आणि लघुसाहित्यांचा जन्मही झाला होता. यंदाही काही प्रमाणात तसाच “ट्रेंड’ असून “प्रकट व्हा, अभिव्यक्‍त व्हा’! अशी टॅगलाइनही देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)