ट्‌विटरवरच्या पोस्ट प्रकरणी ऋषी कपूर अडचणीत

सतत ट्विटर अकाउंटवर ऍक्‍टिव्ह असलेले अभिनेते ऋषी कपूर यांच्या विरोधोत मुंबई पोलिस आणि सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. ऋषी कपूर यांनी ट्‌विटरवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे त्यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. हा फोटो एका लहान मुलाचा असून त्यात तो न्यूड दिसत आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडेही याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

“जय हो’ फाऊंडेशनचे ऍडव्होकेट आदिल खत्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. सायबर सेलकडून मात्र अद्याप तक्रार मिळाल्याचा दुजोरा मिळालेला नाही. सध्या देशभरात चर्चेचा विषय असलेल्या बाबा राम रहीम यांच्या प्रकरणाशी संबंधित असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. कारण ट्‌वीटचा अन्वयार्थ एखाद्याचे चुकीचे अनुकरण केले की काय होते, असा दिसत आहे. तसेच ऋषी कपूर यांनी या ट्‌वीटच्या आधी केलेले दोन ट्‌वीटही राम रहीम यांच्या प्रकरणासंबंधी संताप व्यक्त करणारे होते. हरियाणात झालेल्या जाळपोळीची नुकसान भरपाई गुरमीत राम रहिम यांच्या समर्थकांकडून वसूल करण्यात यावी, असे ऋषी कपूर यांनी म्हटले आहे. तसेच बाबा, माता आणि तथाकथित धर्मगुरुंच्या वाढत्या प्रस्थाबाबतही त्यांनी संताप व्यक्‍त केला आहे. हे सगळे जण गुन्हेगार असल्याचेही ऋषी कपूर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)