ट्विटर आणि सोशल मीडियामुळेच राष्ट्राध्यक्ष बनू शकलो-डोनॉल्ड ट्रम्प

वॉशिंग़्टन – ट्विटर आणि सोशल मीडियामुळेच मी राष्ट्राध्यक्ष बनू शकलो, असे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनॉल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. एका जर्मन पत्रकाराने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते बोलत होते.

तुम्ही वेळोवेळी करत असलेल्या अनेक ट्विटसचा तुम्हाला कधी खेद वाटला आहे का, असा प्रश्‍न डोनॉल्ड ट्रम्प यांना एका जर्मन पत्रकाराने विचारला होता. या प्रश्‍नाला उत्तर देताना डोनॉल्ड ट्रम्प म्हणाले, की ट्‌विटर आणि सोशल मीडिया यांनी मला प्रसिद्धी माध्यमांविरुद्ध लढण्याचे सामर्थ्य दिले. ट्विटर आणि सोशल मीडिया यांच्यामुळेच मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बनू शकलो, असे त्यांनी पत्रकाराच्या प्रश्‍नाला उत्तर देताना संगितले.

अमेरिकेच्या दौऱ्यवर असलेल्या जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यासमवेत व्हाईट हाऊसमध्ये एका संयुक्त पत्रकार परिषदेत डोनॉल्ड ट्रंम्प पत्रकारांशी संवाद साधत होते. ट्‌विटर नसते, तर कदाचित मी आज व्हाईट हाऊसमध्ये नसतो, असे स्पष्ट करून ते म्हणाले, की आमच्याकडे समजूतदार लोकांचा एक मोठा समूह आहे. हा समूह विचार करतो. प्रसिद्धी माध्यमे सत्य मांडत नाहीत, तेव्हा मी ट्‌विटर आणि सोशल मीडियाद्वारे त्यांचा सामना करू शकतो, म्हणून मला ट्विटर आणि सोशल मीडिया पसंत आहे.

फोन टॅपिंग़च्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, की माझ्या आणि जर्मन चॅन्सेलर यांच्यात ओबामा प्रशासनाशी संबधित काही गोष्टी समान आहेत. मात्र ट्रम्प हे बोलत असताना अँजेला मर्केल यांनी मौन धारण केले होते. मीडियात आलेल्या बातम्यांनुसार ओबामा प्रशासनकाळात अमेरिकन गुप्तचर संस्थांनयांचे फोनवर पाळत ठेवली होती, आणि ही बातमी फुटल्यानंतर जागतिक पातळीवर अमेरिकेला शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)