नवी दिल्ली : ट्विटर वापरकर्त्याच्या अकाउंटच्या फॉलोअर्सची नेमकी व खरी संख्या कळावी यासाठी बनावट व आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या फॉलोअर्सची संख्या भरमसाट झाली आहे त्यात लक्षणीय घट होईल.

ट्विटरवरील अनेक न वापरली जाणारी (लॉक्ड्) अकाउंटही बंद करण्यात येणार आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटच्या फॉलोअरची संख्या प्रचंड वाढली आहे, ती विक्रमी झाली आहे अशा बढाया काही जणांकडून मारल्या जातात. राजकीय नेते, उद्योगक्षेत्रातले धुरिण, मनोरंजन क्षेत्रातील कलाकार व अन्य मंडळी आपण किती लोकप्रिय आहोत हे दाखवण्यासाठी फॉलोअरच्या संख्येचा दाखला देत असतात. पण बनावट किंवा आॅटोमेटेड अकाउंटद्वारे ही संख्या फुगवली जाते असे काही उदाहरणांत दिसू आले आहे.

फॉलोअरची संख्या वाढविण्याचे कंत्राटच ही मंडळी काही संस्थांना देतात. या गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी दिलेल्या निवेदनात टिष्ट्वटरने म्हटले आहे की, बनावट व आॅटोमेटेड अकाउंट काढून टाकल्यानंतर अनेक टिष्ट्वटर अकाउंटच्या फॉलोअरची संख्या कमी झाल्याचे लक्षात येईल. पण ती किती घटली हे नमूद केले जाणार नाही.

समाजमाध्यमांद्वारे अफवा न पसरविण्याचे प्रकार खूप वाढल्याने हिंसक घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे केंद्राने फेसबुक, व्हॉट्सअप, टिष्ट्वटर यांंना धारेवर धरले होते. अखेर ट्विटरने लाखो बनावट अकाउंट काढून टाकण्याचे ठरवले आहे.
एखादे लॉक्ड् असलेल्या अकाउंटवरून अचानक काही वेगळा मजकूर लिहिला जातो. अफवा वा खोट्या माहितीची लिंक दिली जाते. आता टिष्ट्वटर मूळ वापरकर्त्याशी संपर्क साधणार आहे. उत्तर समाधानकारक न वाटल्यास ते अकाउंट बंद करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)