ट्रॉमाकेअर त्वरीत सुरू करा, अन्यथा मनसे स्टाईने आंदोलन

राजगुरूनगर -चांडोली (राजगुरुनगर) येथील ग्रामीण रुग्णालयात बांधण्यात आलेले ट्रॉमाकेअर सेंटर लवकर सुरु करावे अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्यावतीने आज (बुधवारी) चांडोली ग्रामीण रुग्णालयात जावून कार्यकर्त्यांनी दिला. व अधीक्षक डॉ. प्रशांत शिंदे यांना धारेवर धरत निवेदन दिले.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, उपाध्यक्ष मनोज खराबी, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, जिल्हा संघटक अभय वाडेकर, माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत जाधव, तालुका अध्यक्ष संदीप पवार, सचिव नितीन ताठे, तालुका उपाध्यक्ष सोपान डुंबरे, अभिजित रायकर, महेश खालते, सुजित थिगळे, पप्पू साळवे, नाथा चोरगे, प्रमोद शिंदे, सागर लांडे, किरण सुतार, भरत थिगळे, किशोर सांडभोर, विनायक टाकळकर, आदित्य शिर्के, विशाल गोतारणे, आकाश गोतारणे, अनिलेत लांडे, विजय फडके, सोयल इनामदार, प्रणव घाटकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात पाच वर्षापूर्वी उभारण्यात आलेले ट्रामाकेअर युनिट बंद अवस्थेत आहे. त्यामध्ये असलेल्या अत्याधुनिक मशीन आल्या नसल्याने त्याचे उद्‌घाटन होत नसल्याचे येथील डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. गेली तीन वर्षे हे युनिट बंद असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.याबाबत आरोग्य विभाग लक्ष देत नाही. येथील ट्रामाकेअर युनिट तत्काळ सुरु करावे अशी मागणी होत आहे. महिनाभरात ट्रामाकेअर युनिट सुरु झाले नाही तर येथील अधीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईची मागणी करून आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधीक्षक डॉ. प्रशांत पवार यांची भेट घेवून निवेदनाद्वारे दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)