ट्रेनर्स, प्रशिक्षकांसाठी रविवारी कार्यशाळा

स्पोर्टस नर्सरीतर्फे आयोजन

पुणे – स्पोर्टस नर्सरी यांच्यातर्फे प्रशिक्षक, ट्रेनर्स, पालक व क्रीडाप्रेमींसाठी येत्या रविवार, 7 ऑक्‍टोबर 2018 रोजी पीवायसी हिंदू जिमखाना येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रामुख्याने क्रीडाविषयक प्रशिक्षण आणि संबंधित उपक्रमांसाठी प्रशिक्षक, ट्रेनर्स यांना विशेष प्रशिक्षण देण्याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, या कार्यशाळेत प्रात्यक्षिक आणि थिअरी यांचा समावेश असणार आहे. या कार्यशाळेत प्रशिक्षकांची भूमिका आणि जबादारी याविषयी सखोल माहिती देण्यात येणार असून मुलांच्या मानसिक व शारीरिक विकासाबद्दल प्रशिक्षक व ट्रेनर्स यांचे उद्‌बोधन करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे मुलांच्या वर्तणुकीचे व्यवस्थापन, परिणामकारक संवाद माध्यम, प्रशिक्षणाच्या पद्धती, सुरक्षित प्रशिक्षण सत्रांचे आयोजन, तसेच विविध क्रीडा प्रकारांसाठी प्रशिक्षण सत्र, याबरोबरच मनोरंजनाचाही कार्यशाळेत समावेश असणार आहे. या कार्यशाळेत प्रात्यक्षिक सत्रांचाही समावेश आहे. युवकांमधील कौशल्य विकासावर या कार्यशाळेत भर देण्यात येणार असून त्यामुळे विशिष्ट क्षेत्रात नोकरीसाठी त्यांना मदत होणार आहे.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठीwww.sportsnursery.in, mahendra.gokhale@gmail.com या संकेतस्थळावर किंवा 9822011307 या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)