ट्रेडिंग म्हणजे जेवढी जोखीम, तेवढीच कमाई! (भाग-१)

शेअर बाजारात गुंतवणूक करावी, पण ट्रेडिंग करू नये, असे म्हटले जाते. पण असे हे जोखीमीचे आणि काही जणांनाच भरपूर पैसे मिळवून देणारे ट्रेडिंग असते तरी कसे, हे समजून घेतले पाहिजे.

मागील आठवड्यातच एका गुंतवणूक संमेलनात सर्वात जास्त चर्चिलेला विषय होता बाजारातील पडझड व व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग. त्यामध्ये बहुतांश नवे गुंतवणूकदार हे हवालदिल दिसत होते तर मुरलेले गुंतवणूकदार काहीसे चिंतेत. परंतु अगदी मोजकेच लोक डेझर्ट्सवर यथेच्छ ताव मारताना दिसत होते म्हणून मी जाऊन त्यांच्याशी हितगुज केल्यावर त्यांच्या आनंदामागील गमक समजलं.

मागील अनेक सत्रांतील काही अपवादात्मक सत्रं सोडल्यास बहुतांशी वेळा बाजार हा खालीच राहिलेला आहे. अशा परिस्थितीत काही लोक असे आहेत की ज्यांनी भरपूर पैसा कमावला आहे. वरवर पाहता ही गोष्ट अशक्य वाटू शकते परंतु हे सत्य आहे. मागील अनेक लेखांत आपण गुंतवणूकीबाबत चर्चा केली आजच्या लेखात आपण थोडं ट्रेडिंगबाबत पाहुयात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रथमतः एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाजारातून आपला उद्देश काय आहे तर पैसे कमावणं ! बाजारातून पैसे कमावण्याच्या दोन पद्धती प्रचलित आहेत. गुंतवणूक (इन्व्हेस्टमेंट) व व्यापार (ट्रेडिंग). बहुतांश लोकांना झटपट पैसे कमावण्यासाठी ट्रेडिंग हे सोयीस्कर वाटतं. परंतु त्यामध्ये जोखीम ही जास्त असल्यानं अनेक लोकांनी त्यात मोठ्या प्रमाणात पैसे गमावल्याचं चित्रच समोर येतं. कल्पना करा, आज तुम्ही आणि तुमच्या मित्रानं शेतात पेरणी करण्यासाठी समान प्रमाणात बियाणं विकत घेतलं. परंतु तुम्ही ते एका दिवसात एखाद्याला विकून त्यातून फायदा मिळवला तर दुसरीकडं तुमच्या मित्रानं ते शेतात पेरणी करण्यासाठी वापरलं. ज्यापासून काही महिन्यात नवीन धान्य उगवलं. त्यातून काही बियाणं त्यानं परत पेरणीसाठी राखून ठेवलं व इतर धान्य विकून ज्यापासून तुमच्या मित्रानं फायदा कमावला. हे अशाप्रकारे वर्षोनुवर्षं चालत राहिलं व प्रत्येक वेळी त्यातून त्यानं चांगला नफा कमावला. आता तुम्ही ते बियाणं न विकता त्यातून गुंतवणूक करून देखील बराच जास्त फायदा कमावू शकला असता. अगदी असाच फरक आहे ट्रेडिंग व गुंतवणूक या दोन प्रकारामध्ये. यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. आपल्या बाजारात या गोष्टी शिकण्यासाठी आपण गुंतवणूक व ट्रेडिंगमधील फरक अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी काही गोष्टी पाहू.

ट्रेडिंग म्हणजे जेवढी जोखीम, तेवढीच कमाई! (भाग-२)

कालावधी : गुंतवणुकीच्या कालावधीस तितकसं महत्त्व नसतं तर मिळणारा नफा हा महत्वाचा असतो परंतु ट्रेडिंगच्या बाबतीत महत्त्व हे वेळेचं असतं. हळूहळू गुंतवणूकीचं रूपांतर संपत्तीमध्ये होतं. तर ट्रेडिंग मध्ये आपण शेअर्स विशिष्ट अवधीसाठी घेतो व विकून टाकतो. यात ढोबळमानानं ट्रेडिंगमध्ये डे-ट्रेडिंग म्हणजे एका दिवसापुरतं ट्रेडिंग, स्विंगट्रेडिंग म्हणजे दोन दिवसांपासून ते एका आठवड्यापर्यंतचं व पोझिशनल ट्रेडिंगचा कालावधी साधारण एक आठवडा ते काही महिने असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)