ट्रेडिंग म्हणजे जेवढी जोखीम, तेवढीच कमाई! (भाग-२)

शेअर बाजारात गुंतवणूक करावी, पण ट्रेडिंग करू नये, असे म्हटले जाते. पण असे हे जोखीमीचे आणि काही जणांनाच भरपूर पैसे मिळवून देणारे ट्रेडिंग असते तरी कसे, हे समजून घेतले पाहिजे.

ट्रेडिंग म्हणजे जेवढी जोखीम, तेवढीच कमाई! (भाग-१)

भांडवल वृद्धी : सर्वांत महत्वाचा मुद्दा म्हणजे भांडवल वृद्धी. काही ब्रोकर्स हे डे-ट्रेडिंगसाठी आपल्या क्लायंट्सच्या असलेल्या भांडवलाच्या सुमारे दहापट किमतीचे शेअर्स घ्यायची किंवा विकायची परवानगी देतात परंतु अशा पोझिशन्स या आपोआप मार्केट बंद व्हावयाच्या आधी ब्रोकर्सकडून बंद केल्या जातात. ट्रेडिंगमध्ये ट्रेडर्स हे शेअर्सच्या भावावर लक्ष ठेऊन असतात (Price movement). ट्रेडिंग हे बाजारात अचूक वेळ साधण्याबाबतचं कौशल्य आहे (To time the market) तर दीर्घ गुंतवणूकीतून उत्तम परताव्याद्वारे व लाभांशाद्वारे संपत्ती बनवणं हा अभ्यास आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जोखीम : नक्कीच बाजारात जोखीम ही अध्याहृतच असते मग ते ट्रेडिंग असो वा गुंतवणूक. तरीही, ट्रेडिंगमध्ये जास्त जोखीम व जास्त परतावा असतो कारण तेथे वेळेस जास्त महत्त्व असतं. याउलट गुंतवणुकीत कमी कालावधीत परतावा थोडा कमी जरी असेल तरी जोखीम देखील कमी असू शकते परंतु दीर्घ मुदतीत जास्त परतावा मिळू शकतो. ट्रेडर्स नफा कमावण्यासाठी ठराविक अवधीत शेअर्स खरेदी-विक्री करतात परंतु त्या वेळेत नफा न झाल्यास वेळ पडल्यास नुकसानीत देखील तो व्यवहार बंद करावा लागतो. गुंतवणुकीबाबतीतमात्र फारसं वेळेचं बंधन नसल्यानं नफा मिळवेपर्यंत वाट पाहता येऊ शकते.

कला विरुद्ध कौशल्य : हे समजून घेऊयात की ट्रेडिंग ही सुपर ओव्हर किंवा २०-ट्वेंटी मॅच आहे तर दीर्घ गुंतवणूक ही टेस्ट मॅचसारखी आहे. यासाठी आपण नुकत्याच झालेल्या भारत व अफगाणिस्तान क्रिकेट मॅचचं उदाहरण घेऊ शकतो. भारत हा नक्कीच तुलनेत बलाढ्य संघ आहे परंतु भारत ती मॅच जिंकू शकला नाही. परंतु हेच टेस्ट मॅचच्या बाबतीत कोणीही ठामपणे सांगू शकतं की भारत मॅच जिंकू शकतो. अगदी अशीच गोष्ट असते बाजाराच्या बाबतीत. अगदी चांगल्या कंपनीच्या शेअरमध्ये सुद्धा डे-ट्रेडिंगमध्ये नुकसान होऊ शकतं परंतु दीर्घ काळात त्याच कंपनीच्या शेअर्समधून चांगला परतावा देखील मिळू शकतो. जसं की, राहुल द्रविडसारखा खेळाडू टी-ट्वेन्टी मॅचमध्ये तितका चांगला खेळ करू शकत नाही जितका तो टेस्ट मॅचमध्ये खेळू शकतो. ट्रेडिंग हे मागणी व पुरवठा यांसंबधीच्या गोष्टींवर अवलंबून असतं व त्यासाठी तांत्रिक गोष्टी अभ्यासाव्या लागतात उदा. आलेखावरील कलबदल, तळपातळी अथवा शिखर पातळी तपासणं, इ. याउलट एखाद्या कंपनीत गुंतवणूक करताना कंपनीबाबतच्या मूलभूत गोष्टीं तपासून ती करावी लागते. उदा. कंपनीचा व्यवसाय, मार्जिन, अर्थार्जन, विविध रेश्यो, इ.

जरी ट्रेडिंग व गुंतवणूक हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असतील तरी दोन्ही गोष्टींमध्ये शिस्त गरजेची आहे. ट्रेडिंगमध्ये अजून एक प्रकार असा आहे की ज्यात पडत्या बाजारात देखील पैसा कमावता येतो. त्याला बाजारात ‘शॉर्ट सेलिंग’ म्हणतात, म्हणजेशेअर्स जवळ नसताना देखील आधी विकणं व नंतर खरेदी करून व्यवहार पूर्ण करणं. सर्वसाधारणपणे, एक तर अशा पोझिशन्स एका सत्रात (इंट्रा-डे) बंद कराव्या लागतात अथवा वायदे बाजारात पोझिशन्स घेतल्यास एक महिन्याभरात. या गोष्टींविषयी पुन्हा कधीतरी पाहू. परंतु बाजाराचा रोख ओळखून योग्य पातळीवर शॉर्ट सेलिंगची कला आत्मसात केल्यास अशा अनिश्चिततेत हेलकावणाऱ्या अथवा पडत्या बाजारात देखील दसरा व दिवाळी साजरी करता येऊ शकते. या लेखात सुरुवातीस उल्लेखल्याप्रमाणे जे थोडे लोक डेझर्ट्स एन्जॉय करत होते ते याच प्रकारात मोडत असतील कारण निफ्टी या निर्देशांकामधे ज्यांनी शॉर्ट पोझिशन्स घेतली असेल त्यांनी थोड्याच अवधीमध्ये बक्कळ नफा कमावला असेल.

मागील आठवड्यात निफ्टीमध्ये एकूण ४६० अंशांची वध-घट झाली तर सेन्सेक्समध्ये १४६५ अंशांचा चढ-उतार पाहावयास मिळाला. येत्या आठवड्यात निफ्टी५० साठी १०२५० ही लागलीच आधार पातळी असेल ज्या पातळीखाली निफ्टी राहिल्यास पुन्हा १०१५० किंवा त्याखालील पातळीही गाठू शकते. तर वरील बाजूस अनुक्रमे, १०३८०, १०४२० व १०५५० या पातळ्यांवर अडथळे संभवतात. तर पाहुयात या आठवड्यात बाजार कोणती दिशा पकडतोय ते !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)