ट्रेडमार्कची नोंदणी करताना…

सतीश जाधव

आपल्याला उद्योग क्षेत्रात नाव कमावायचे असेल, आपल्या अंगी व्यवसाय कौशल्य असेल आणि आपण सर्व तयारीनिशी बाजारात उतरतो. मग ते पैसे गोळा करणे असो किंवा मार्केट रिसर्च असो, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण ट्रेडमार्क नोंदणीची प्रक्रिया समजून घेतली आहे का? जर नसेल तर आपण आपला उद्योग प्रसिद्धीसाठी अजूनही योग्य पावले उचलले नसल्याचे समजून घ्यावे. उद्योजक या नात्याने आपल्या उत्पादनाला प्रसिद्धी द्यायची असेल आपल्याला मार्केटिंग, वितरण या पातळीवर जोरात तयार करावी लागते. मात्र, त्याअगोदर ट्रेडमार्क रजिस्टर्ड करावा लागेल. ग्राहकांच्या मनावर ठसेल, रुजेल असा ट्रेडमार्क तयार करणे गरजेचे आहे. ट्रेडमार्क पाहताच अमूक प्रकारचे प्रॉडक्‍ट आहे, असे ग्राहकाला वाटायला हवे. भारतात ट्रेडमार्क नोंदणीसाठी कोणकोणत्या प्रक्रियेतून जावे लागते, हे पाहू या.

नोंदणीची प्रक्रिया :

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारतात रजिस्ट्रार ऑफ ट्रेड मार्क्‍स नावाची संस्था ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनचे काम करते. ट्रेडमार्कच्या नोंदणीसाठी एक बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे आपण देशात कोणत्या भागात व्यवसाय करत आहोत. जर आपला व्यवसाय देशातील चार प्रमुख दक्षिण राज्यात करत असाल तर चेन्नईत फाईल दाखल करणे गरजेचे आहे, पश्‍चिम राज्यात करायचा असेल तर अहमदाबाद किंवा मुंबई, पूर्व भागात करायचा असेल तर कोलकता येथे तर उत्तर राज्यात व्यवसाय करायचा असेल तर नवी दिल्लीत नोंदणीची प्रक्रिया पार पाडावी लागेल. आपण आपल्या नावाने किंवा व्यवसायाच्या नावाने ट्रेडमार्क फाईल दाखल करू शकता. जर आपल्याला व्यवसायाच्या नावावरून सभ्रंम असेल तर आपल्याच नावाने नोंदणी करावी. जर कंपनीच्या नावाने ट्रेडमार्क घेत असाल तर हा ट्रेडमार्क कंपनीबरोबरच इतिहासजमा होईल. सर्वसाधारण बाजारपेठेत सर्वांच्या सल्ल्यानुसार ट्रेडमार्क कसा असावा हे ठरवावे. अर्ज भरण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला आपल्या ट्रेडमार्कची श्रेणी निवडावी लागेल. ट्रेडमार्क्‍सचे नियम, 2002 च्या शेड्यूल 4 मध्ये 45 उपलब्ध श्रेणीतून त्याची निवड करावी लागेल. श्रेणी निवडताना थोडीशी हुशारी दाखवावी. जसे के श्रेणी 24 मध्ये टेक्‍स्टाईल आणि टेक्‍स्टाईल गूडस्‌चा समावेश असतो तर श्रेणी 25 मध्ये क्‍लोथ, फुटविअर, हॅंडगिअरचा समावेश असतो. श्रेणीतील फरक समजून नोंदणीची प्रक्रिया करावी.

याकडे लक्ष द्या :

ट्रेडमार्क नोंदणीसाठी अर्जाच्या शुल्काशिवाय सरकारी कर रूपातून 3500 रुपये भरावे लागतात. ट्रेडमार्कची निवड करताना एखाद्या नावापुढे एंटरप्रायजेस किंवा सन्स लावल्याने अन्य ट्रेडमार्कपेक्षा वेगळा होत नाही. एकदा अर्ज केल्यानंतर रजिस्ट्रार हा आपले ट्रेडमार्क हे युनिक आहे की कॉपी केले आहे, याची चाचपणी करतो. या प्रक्रियेसाठी 8 ते 10 महिन्यांचा कालावधी लागतो. यादरम्यान ट्रेडमार्कला आव्हान देण्यासाठी नागरिकांना पर्याय दिला जातो. जर आपल्या ट्रेडमार्कला कोणी आक्षेप घेतला नाही तर संपूर्ण प्रक्रिया अर्ज दाखल केल्यापासून 18 ते 24 महिन्यांत पूर्ण होते. ज्याप्रमाणे आपण अर्ज दाखल करताच आपल्या प्रॉडक्‍टच्या नावावर टीएमचा वापर करण्यास सुरू करू शकता. एकदा आपल्या नावाची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण झाली की आपल्या नावाबरोबर वर्तुळाकार आर चिन्हाचा वापर करायला हरकत नाही. ट्रेडमार्क नेहमीच घरगुती प्राधिकरणाद्वारे प्रदान केले जाते. जर आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर ट्रेडमार्कचा वापर करू इच्छीत असाल तर आपल्याला प्रत्येक देशातील ट्रेडमार्क कार्यालयात वेगळा अर्ज दाखल करावा लागेल. ट्रेडमार्कचे वितरण हे घरगुती प्राधिकरणाकडून केले जाते. लक्षात ठेवा प्रत्येक देशात ट्रेडमार्कच्या प्रक्रियेत थोडाफार फरक असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)