ट्रेझरी कार्यालयातील लाखचोर लिपीकाला पकडले

ट्रेझरी कार्यालयातील लाखचोर लिपीकाला पकडले
पुणे, दि. 9 – एक हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या लेखा लिपीकास रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मंगळवारी केली. सुमेध पुरुषोत्तम डोईफोडे ( 31), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 31 वर्षाच्या व्यक्‍तीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा प्रवासभत्ता देयक मंजुरीसाठी आरोपीने दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती एक हजाराची रक्‍कम देण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दाखल झाल्यावर शहानिशा करून सापळा रचण्यात आला. उप अधीक्षक दत्तात्रय भापकर, निरीक्षक सुरेखा घार्गे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)