पुणे – वेतनवाढीच्या फरकाचे मंजूर झालेले 1 लाख 10 हजार रुपयांचे बील मिळण्याकरिता 1 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलेल्या ट्रेझरी कार्यालयातील लेखा लिपिकाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी विशेष न्यायाधीश के.डी.वडणे यांनी सुनावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (दि.12 जुलै)
बंडगार्डन येथील ट्रेझरी कार्यालयात गुरूवारी ही कारवाई केली.
राहुल देवीदास दुधेकर (वय 40, रा. बारामती) असे लाच घेताना अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदार हे शासकीय कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनवाढीच्या फरकाचे मंजूर झालेले बील देण्यासाठी बंडगार्डन येथील ट्रेझरी कार्यालयात काम करणारे दुधेकर यांनी त्यांच्याकडे एक हजार रूपयांची लाच मागितली. मात्र, लाच देणे फिर्यादीला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती एसीबीला दिली. त्यानुसार एसीबीने ही कारवाई करत दुधेकर याला अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी अधिक तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. त्यानुसार विशेष न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)