ट्रेंड ‘फॉरेन डेस्टिनेशन वेडींग’चा

भारतीयांच्या ‘लग्न’ संस्कृतीबाबत पाश्चिमात्य देशांमध्ये भयंकर ‘क्रेझ’ आहे. लग्नाच्या बाबतीतले आपले रीतिरिवाज, खानपान, पोशाख हे इतर संस्कृतींच्या तुलनेत अधिक ‘भारदस्त’ असल्याने भारतीय लग्नांचे वर्णन ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ असे केले जाते. भारतीय लग्न पद्धतीच्या बाबतीत जगभरामध्ये कमालीची उत्सुकता असली तरी तमाम भारतीयांचे आयकॉन असलेले अनेक ‘बॉलिवूडकर’ फॉरेन डेस्टिनेशन वेडींगला प्राधान्य देत आहेत. भारतीय लग्नांमधील धामधूम टाळत अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या इटली येथील ड्रीम मॅरेज नंतर आता दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडकर कपल देखील वीरूष्काचाच कित्ता गिरवत आपल्या वेडींगसाठी इटलीला रवाना झाले आहेत. परंतु बॉलिवूडमध्ये वीरूष्का आणि दीप-वीर यांच्या आधी देखील अनेक बॉलिवूडकरांनी आपल्या मॅरेजसाठी ‘ फॉरेन डेस्टिनेशन’ला  पसंती दिली आहे. अशाच काही फेमस बॉलिवूडकरांची  फॉरेन डेस्टिनेशन मॅरेजेसची लिस्ट खास आपल्यासाठी…

राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा : मीडियामध्ये अनेक चर्चांनंतर देखील आपल्या नात्याबद्दल राणी आणि आदित्य यांनी नेहमीच गुप्तता बाळगली. आपल्या लग्नात बाबत देखील या कपलने सिक्रसी कायम ठेवत मोजक्याच पाहुण्यांच्या व मित्रमंडळींच्या उपस्थितीत इटली येथे २१ एप्रिल २०१५ लग्नगाठ बांधली.

-Ads-

जॉन अब्राहम आणि प्रिया रुंचाल : बिपाशा सोबतच्या आपल्या लॉंग टर्म रिलेशिनशिप मधून जॉनने काडीमोड घेतल्यानंतर त्याच्या फॅन्सना मोठा धक्का बसला होता. अशातच जॉनने प्रिया रुंचाल हिच्याशी २०१४ मध्ये लॉस अँजिलस येथे सिक्रेटली मॅरेज करून आपल्या फॅन्ससहित  बॉलिवूडकरांना देखील सरप्राईझ केलं होत.

प्रीती झिंटा आणि जीन गुडेनॉ : प्रीती झिंटा हिचं नाव अनेक क्रिकेटर व बॉलिवूड सेलेब्रिटीजशी जोडलं गेलं मात्र सरतेशेवटी प्रीतीने जीन गुडेनॉ नामक एका अमेरिकन व्यवसायिकाशी २८ फेब्रुवारी २०१५ला लॉस अँजिलस येथे रेशीम गाठ बांधली.

मोहित मारवाह आणि अंतरा मोतीवाला : ‘फगली’ फेम मोहित मारवाह याने अंतरा मोतीवाला हिच्यासोबत सप्तपदी घेण्यासाठी दुबईची निवड केली. हा शाही विवाहाचे आयोजन तब्ब्ल तीन दिवसांसाठी करण्यात आले होते. मोहित आणि अंतरा यांचा विवाह सोहळा २० फेब्रुवारी २०१८ ला पार पडला होता.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)