ट्रेंड पेंटहाऊस खरेदीचा

पेटहाऊस हे एक आलिशान जीवनशैलीचे प्रतिक असणारे आणि झगमगाट करणारे अपार्टमेंट असून ते बहुमजली इमारतीच्या टॉप फ्लोअरवर दोन अपार्टमेंटसला जोडून तयार केलेले असतात. पेंटहाऊस जेवढे शानदार असेल, त्याप्रमाणात त्यात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. महानगरात काही हॉटेल्स इमारतीच्या वरच्या मजल्यावर असतात. ते पेंटहाऊसचे रुपांतर हॉटेलमध्ये करतात. ग्राहकांना जेवणाचा आस्वाद घेताना शहराचाही नजरा दृष्टीक्षेपास पडेल, असा त्यामागचा उद्देश असतो. चित्रपटातील नट-नट्या, सेलिब्रिटी, राजकारणी मंडळी, उद्योजक ही पेंटहाऊस घेण्याबाबत अधिक सजग असतात.

कोणत्याही बहुमजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या पेंटहाऊसवरून शहराचे सौंदर्य दृष्टीपथात येते. ज्याठिकाणी अपेक्षेपेक्षा कमी हवा आणि ध्वनीप्रदूषण असते, असे पेंटहाऊस सर्वानाच हवेहवेसे वाटणारे असते. पेंटहाऊसमध्ये राहण्यासंदर्भात तीन एल म्हणजे लोकेशन-लेबल आणि लक्‍झरी (बिल्डर-आर्किटेक्‍ट-ब्रॅंडस) हे पाहणे महत्त्वाचे आहे. जगभरातील नामांकित खरेदीदार बहुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर पेंटहाऊस खरेदी करण्याबाबत उत्सुक असतात. या पेंटहाऊसमध्ये प्रसिद्ध आर्किटेक्‍टची कलाकुसर, अत्याधुनिक सुविधा आणि तंत्र, सुरक्षितता, अलिशान सुविधा, शहर किंवा बगिचा याचे विहंगम दर्शन, उंच छत असलेल्या रुम्स, मोकळी जागा या गोष्टींचा समावेश असतो.

मोठ्या संख्येने धनाढ्य मंडळी गुंतवणूक करण्यासाठी पेंटहाऊसची खरेदी करतात. यामध्ये असणाऱ्या सामान्य अर्पाटपेटच्या तुलनेत सुविधा वेगळ्या प्रकारच्या असतात. नैसर्गिक वस्तूंपासून तयार केलेले दरवाजे, स्विमिंग पूल, मार्बल, हॉट टबचे खुले बाथरुम, घरातील तापमान, मॉड्यूलर किचन, आऊटडोर इंफिनिटी पूल्स या गोष्टींचा अंतर्भाव असतो. लाइट फिटिंग्जमध्ये उच्च तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. ऍम्पी थिएटर, गोल्फ सिम्यूलेटर, मिनी थिएटर याचाही पेंट हाऊसमध्ये समावेश असतो. पेंट हाऊस ड्युप्लेक्‍स (दोन मजली) असेल तर वरच्या मजल्यांवर लाऊंजची व्यवस्था असते. अशा घरातील प्रत्येक गोष्टीत ऊर्जेचा समतोल वापर केलेला असतो. ही घर भूकंपविरोधी, विजविरोधी असतात. मोटोराईज्ड पडदे, मोशन सेंन्सर लायटिंगची सुविधा प्रदान केलेली असते.

जागेचे ठिकाण महत्त्वाचे

कोट्यवधी किंमतीचे पेंटहाऊस खरेदी करताना लोकेशन देखील महत्त्वाचे ठरते. पेंटहाऊसवरून शहराचे सौंदर्य न्याहाळता यावे, अशी अपेक्षा असते. त्यामुळे पेटहाऊस तयार करताना निर्माता आणि खरेदीदार याकडे अधिक लक्ष देतो. तज्ञांच्या मते, पेंटहाऊस हे सर्वसाधारपणे इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर तयार केले जाते. ज्याठिकाणी आधुनिक वास्तुशिल्प आणि समकालिन डिझाईनचा सुंदर मेळ साधला जातो. घराला नैसर्गिंक सौंदर्य जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला जातो.

सर्वसाधारण फ्लॅटपेक्षा पेंटहाऊसमधील खोल्या तुलनेने मोठ्या असतात. त्याचवेळी मोठी बाल्कनी, प्लंज पूल, टेरेस गार्डन याचाही समावेश काही पेंटहाऊसमध्ये केला जातो. या घराच्या खरेदीसाठी बाजार कायम उत्सुक असतो. मुंबई, दिल्लीत पेंटहाऊसला जबरदस्त मागणी आहे.

आशिष जोशी 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)