ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीसमोर श्रीलंकेची वाताहत

न्युझिलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी क्रिकेट मालिका

ख्राईस्टचर्च: न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या श्रीलंके विरुद्धच्या बॉक्‍सिंग डे कसोटी सामन्यात यजमान न्यूझीलंडचा पहिला डाव 178 धावांवर गुंडाळणाऱ्या श्रीलंकेला आपल्या पहिल्या डावात चांगलाच धक्का बसला आहे. ट्रेंट बोल्टच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करलेली दिसून आली. यावेळी बोल्टने अवघ्या 15 चेंडूंत लंकेच्या सहा फलंदाजांना तंबूत पाठवण्याचा पराक्रम करत श्रीलंकेचा पहिला डाव केवळ 104 धावांमध्येच रोखण्यात यश मिळवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी श्रीलंकेने न्यूझीलंडला पहिल्या डावात सर्वबाद 178 धावांत रोखल्यानंतर, न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. बोल्टने अवघ्या 15 चेंडूत 4 धावा देत सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बोल्टच्या माऱ्यापुढे अवघ्या 20 मिनीटांमध्ये श्रालंकेच्या संघाने आपले सहा गडी गमावले. पहिल्या दिवसाअखेर श्रीलंकेने 4 बाद 88 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी टिम साऊदीने लंकेच्या चार गड्यांना बाद केले होते. दुसऱ्या दिवशी बोल्टने अवघ्या 20 मिनिटांमध्येच लंकादहन केले.

बोल्टने फक्त 15 चेंडूत सहा विकेट घेतल्या. त्यामधील अखेरच्या पाच विकेट 11 चेंडूत घेत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत पाच विकेट्‌स घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. याआधी हा विक्रम मॉन्टी नोबेल, जॅक कॅलिस आणि केमार रोच यांच्या नावावर संयुक्तरित्या होता. यांनी 12 चेंडूत 5 बळी घेण्याचा पराक्रम केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)