ट्रॅव्हल, टुरिझम उद्योगात अनेक संधी

पुणे- ट्रॅव्हल आणि टुरिझम उद्योगातील आदरातिथ्य अथवा पाहुणचार हा एक प्रमुख भाग आहे. तरुणांना या उद्योगात अनेक संधी असून संधीचे सोने करून शिखर सर करता येणार आहे. सध्या या उद्योगांमध्ये व्यवस्थित काम करणारा, कौशल्यपूर्ण आणि निष्ठेने काम करणाऱ्यांची कमतरता आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी सूर्यदत्त मधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या आंतरराष्ट्रीय भोजन कार्यक्रमाच्या अनेक कार्यक्रमांतून प्रशिक्षण देण्यात येत आहे, अशी माहिती सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी दिली.

सूर्यदत्त हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीने बावधन येथील कॅम्पसमध्ये आंतरराष्ट्रीय खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. चोरडिया यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमाला देश आणि परदेशातील तीनशेहून अधिक नागरिक उपस्थित होते. यावेळी “21 व्या शतकातील आवाहने’ या विषयावरील एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. स्लॉव्हेनियाचे डॉ. डॅनिला तुर्क, इटलीचे तोनिना लॅम्बोगिनी, लॉर्ड अलडेरडिस जॉन, युकेचे हार्वे व्हाईटहाऊस, डेन्मार्कचे जे. पे. ओल्सेन, क्रिले ब्रेट, डॉ. मार्क हेकर, डॉ. मकरंद जावडेकर, एअर मार्शल भूषण गोखले, निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन कळमकर, डॉ. संदिप वासेलकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

सूर्यदत्त हॉटेल मॅनेजमेंटचे प्राचार्य अँथनी डिसोजा म्हणाले, केवळ खाद्यपदार्थ तयार करणे हा उद्देश न ठेवता विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष टेबल सेवेचा अनुभव घेता यावा, टेबल शिष्टाचार आणि चांगल्या वागणुकीचे नियम, खाद्य पदार्थांची नोंदणी, खाद्य पदार्थ पुरविण्याच्या सेवा, पाहुणचार सेवा या गोष्टी शिकता येऊन कामाचा प्रत्यक्ष अनुभव यावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कॅन्डल डिनर बरोबरच परदेशी पाहुण्यांनी भारतीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. चविष्ट अन्न, उत्तम टेबल सेवा, पाहुणचार आणि संगीत याचा परदेशी लोकांनी अनुभव घेतला. कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांचे आभार मानण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)