ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय फोडून सत्तर हजारांची चोरी

पुणे – पर्पल टुर्स ऍन्ड ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाचे कुलूप उचकटून आत शिरलेल्या चोरट्यांनी कपाटातील सत्तर हजार रुपयांची रोकड लांबविली. 28 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पौड रस्त्यावर असणाऱ्या सरस्वती सदन इमारतीतील टुर्सच्या कार्यालयात ही घटना घडली. निलेश पवळे (वय 38, रा. दांगट पाटील नगर, शिवणे) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कार्यालय बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला आणि कपाटातील सत्तर हजार रुपयांची रोकड लंपास केली. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पांढरे अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)