ट्रॅफिक वॉर्डनच्या मोटारीची तोडफोड

पिंपरी – हॉर्न वाजविल्याच्या रागातून टोळक्‍याने ट्रॅफिक वॉर्डनच्या मोटारीचा पाठलाग करून त्यांना शिवीगाळ करत मोटारीची तोडफोड केली. हा प्रकार थेरगाव मधील बापूजी बुवा कॉर्नरवर गुरुवारी (दि. 28) मध्यरात्री एकच्या सुमारास झाला.

बालाजी किसन सगर (वय-38, रा. इंद्रायणी नगर, थेरगाव) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर उर्फ विनोद सातपुते (रा. गणराज कॉलनी, थेरगाव) याच्यासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सगर ट्राफिक वॉर्डन म्हणून वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते आपल्या मोटारीने घरी जात होते. त्यावेळी रस्त्याच्या मधोमध सातपुते हा त्याच्या तीन मित्रांसोबत बोलत थांबला होता. रस्त्यावरून जाण्यासाठी सगर यांनी हॉर्न वाजविला. त्यावरून सातपुते आणि सगर यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. सातपुते याने त्याच्या तीन मित्रांना घेऊन सगर यांच्या मोटारीचा पाठलाग केला. मोटारीवर दगडफेक करून मोटारीचे नुकसान केले. सगर यांनी मोटारीतून पळ काढला, त्यामुळे ते बचावले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)