ट्रॅक्‍टर नदीत कोसळून एक जखमी

उरुळी कांचन – दहिटणे ते खामगाव येथील पुलावरून ट्रॅक्‍टर खाली कोसळून एक जण जखमी झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या उसाची तोडणी अंतिम टप्प्यात आहे. दौंड तालुक्‍यातील दहिटणे आणि खामगाव येथेही ऊस तोडणी सुरू आहे. आज (दि. 23) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उसाचा ट्रॅक्‍टर या भागातून भीमा पाटस कारखान्याकडे जात असताना दहिटणे-खामगाव पुलाला कठडे नसल्याने नदीच्या पाण्यात कोसळला. यात एक जण जखमी झाला आहे. ही घाटना येथील नागरिकांनी पाहिल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी दहिटणे येथील मूक-बधीर मुलगा अमोल ठोंबरे आणि इतर नागरिकांनी मदत करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)