ट्रॅक्‍टर अंगावर पडून ओतूरमध्ये चालकाचा मृत्यू

ओतूर-ओतूर तांबेमळा नंबर दोन येथे चालकाच्या अंगावर ट्रॅक्‍टर पडून त्याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास घडला.
रविंद्र नवसु जाधव (वय 35, मूळ रा. पल्लीपाडा मारूळफाटा, ता. भिवंडी, जि. ठाणे; हल्ली रा. ओतूर तांबेमळा नं. 2, ता. जुन्नर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे हवालदार टी. डी. दाते हे अधिक माहिती देताना म्हणाले की, रविंद्र नवसु जाधव हा रविवारी (दि. 25) ओतूर तांबेमळा नं. दो वरून जाकमाथा रस्त्याने ट्रॅक्‍टर घेऊन जात असताना एस वळणावर सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास रिकामा रिकामा ट्रॅक्‍टर चालक रवींद्र नवसु जाधव याच्या अंगावर पडल्याने रवींद्र जाधव हा ट्रॅक्‍टर चालक ठार झाला. पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सूरज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार टी. डी. दाते हे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)