ट्रॅक्‍टरसाठी शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड

नगर – राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत 20 (एचपी) अश्‍वशक्तीपर्यंतच्या ट्रॅक्‍टरसाठी अ.नगर तालुका कृषी कार्यालय येथे उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांच्या हस्ते तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे व शेतकरी यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात आली.

यावेळी तंत्र अधिकारी रवींद्र माळी, मंडल कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, अंकुश टकले, अमिन पठाण, संजय बोरुडे, बाळासाहेब काकडे, डी. टी. जावळे, संजय मेहेत्रे, लक्ष्मण उगले, नारायण करांडे, जालिंदर गांगर्डे, बाळासाहेब जावळे, मेचकर आदी उपस्थित होते.यावेळी तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब नितनवरे यांनी माहिती दिली की, 2018-19 साठी नगर तालुक्‍यातुन 281 अर्ज प्राप्त झाले आहेत. पैकी 8 हेक्‍टरचे लक्ष्यांक असून, सोडत पद्धतीने काढण्यात आलेल्या प्रथम 8 शेतकऱ्यांना ट्रॅक्‍टरचे वाटप करण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेतकऱ्यांना अगोदर निवडपत्र देणार असून, पत्र दिल्यानंतर शेतकऱ्यांची 7/12 8अ, कोटेशन परिक्षण अहवाल, राष्ट्रीयीकृत बॅंकेचे खाते, पासबुक, आधारकार्ड आदी कागदपत्रांची पूर्तता तालुका कृषी कार्यालय, येथे जमा करावी. कागदपत्रांची छावणी करून ट्रॅक्‍टर घेण्यासाठीची पूर्वसंमती देण्यात येईल. तद्नंतर पूर्ण संमती मिळालेल्या शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टर खरेदी करून अनुदान प्रस्ताव तालुका कृषी कार्यालय, नगर येथे जमा करावा. तद्नंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर पी.एफ.एम.एस. प्रणालीने वर्ग करण्यात येईल. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे म्हणाले की, शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी नेहमी वेळोवेळी प्रयत्न करीत असून, शेतकऱ्यांनीही शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपल्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)