ट्रॅक्‍टरची ट्रॉली चोरणारे दोघे गजाआड

वाठार स्टेशन, दि. 22 (वार्ताहर) – जांब खुर्द, ता. कोरेगाव येथून ट्रॅक्‍टर ट्रॉली चोरीस गेली होती. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलिसांनी दोनजणांना अटक केले आहे.
वाठार स्टेशन पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार सौ. संगीता आत्माराम गुरव. यांच्या मालकीची लाल रंगाची ट्रॉली 75 हजारांची ट्रॅक्‍टर ट्रॉली गावातील तेलकी शिवारातून चोरीस गेली होती. याबाबतची फिर्याद वाठार पोलीस स्टेशनला दाखल झाली होती. त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून वाठार स्टेशन पोलिसांनी निखिल मधुकर जगदाळे वय वर्षे 21 रा. कुमठे, ता. कोरेगाव, शुभम विजय घोरपडे वय 18 रा. जांब खुर्द यांना अटक करून ट्रॅक्‍टरची ट्रॉली जप्त केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पो. हवा. चोरट, पो. ना. केंजळे यांनी केले असून तपास पो. हवा. भोसले करत आहेत. संशयीतांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीचा असणारा रंग लाल बदलून हिरवा दिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)