“ट्री गार्ड’ दुरुस्तीसाठी 17 लाखांचा खर्च

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत शहरात ठिकठिकाणच्या झालेल्या झाडांच्या संरक्षक जाळ्या काढल्या जाणार आहेत. या जाळ्या दुरुस्त करण्यासाठी 16 लाख 82 हजार रुपये खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या सभेत ऐनवेळी मान्यता देण्यात आली.

महापालिकेच्या उद्यान विभागातर्फे शहरात विविध ठिकाणी झाडे लावली जातात. झाडांचे संवर्धन होण्यासाठी झाडांना “संरक्षक जाळ्या’ लावले जातात. झाड मोठे झाल्यानंतर ते पिंजरे काढून दुरुस्त केले जातात. महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील मोठ्या झालेल्या झाडांच जाळ्या काढून दुरुस्त केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यामध्ये तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शुभम उद्योग, प्रियंका इंन्टरप्रायजेस आणि डायनामिक सिस्टीम गार्डन डिपार्टमेन्ट या तीन ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी शुभम उद्योग या ठेकेदाराने निविदारकमेपेक्षा 23.59 टक्के कमी दराने निविदा भरली. इतर ठेकेदारांच्या तुलनेत शुभम उद्योग यांची सर्वात कमी दराची निविदा असल्याने अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी ती निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार महापालिकेच्या आठही प्रभागातील मोठ्या झालेल्या झाडांच्या जाळ्या काढून दुरुस्त करण्याचे काम शुभम उद्योग या ठेकेदाराकडून 16 लाख 82 हजार 470 रुपयांत करुन घेतले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)