“ट्रिपल एक्‍स’च्या पुढच्या सिरीजमध्ये दीपिका

हॉलिवूडचा स्टार वेन डीझलच्या “ट्रिपल एक्‍स’ सिरीजच्या पुढील भागामध्ये दीपिका पदुकोण असणार हे आता कन्फर्म झाले आहे. दीपिका साकारत असलेले सेरेना अंगर हे पात्र पुढील भागामध्येही कायम असणार आहे. “ट्रिपल एक्‍स’ सिरीजचा डायरेक्‍टर डिजे क्रूसोने सोमवारी हे जाहीर केले. या सिरीजच्या चौथ्या सिनेमामध्ये चिनी गायक रॉय वांगपण असणार आहे.

दीपिकाने “ट्रिपल एक्‍स’ सिरीजच्या “रिटर्न ऑफ झेंडर केज’मधून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेंव्हापासून तिला हॉलिवूडमधील सिनेमांच्या ऑफर यायला लागल्या होत्या. खरे सांगायचे तर “झेंडर केज’ला प्रेक्षकांकडून खूपच थंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामध्ये वेन डिझलची अॅक्‍शन आणि दीपिकाचा जलवा असला तरी कथेच्या बाबतीत एकूणच दर्जा नव्हता, अशीच निरीक्षकांची प्रतिक्रिया होती. बॉक्‍स ऑफिसवरही या सिनेमाला फारसे चांगले यश मिळू शकले नव्हते, पण तरीही दीपिकाचा हॉलिवूडमधील पहिला सिनेमा म्हणून भारतीय प्रेक्षकांनी तो बघितला होता, पण बॉलिवूडमध्ये “बाजीराव- मस्तानी’, “पद्‌मावत’, “गोलियोंकी रासलीला – रामलीला’ आणि “चेन्नई एक्‍सप्रेस’ सारखे हिट सिनेमे देणाऱ्या दीपिकाला हॉलिवूडच्या सुरुवातीलाच अपयश मिळाले, पण त्यामुळे तिने हार मानलेली नाही. आता “ट्रिपल एक्‍स’ सिरीजच्या चौथ्या सिनेमामध्ये तिला अधिक स्कोप असणार आहे. यावेळी “ट्रिपल एक्‍स’मध्ये बॉलिवूड स्टाईल एखादे गाणेही असणार आहे. या गाण्यानेच सिनेमाचा शेवट करण्याचा क्रूसोचा इरादा आहे. स्वाभाविकपणे या गाण्यामध्ये दीपिका थिरकताना बघायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे “चेन्नई एक्‍सप्रेस’मध्ये “लुंगी डान्स’ ने शेवट केला गेला होता, तसेच हे गाणेही असण्याची शक्‍यता आहे.

दुसरीकडे दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू झाली आहे. 20 नोव्हेंबरला हे दोघे विवाहबंधनात बांधले जाणार आहेत. त्यानिमित्ताने रणवीरने आपल्या मित्रमंडळींना ओरलॅन्डोमध्ये एक “बॅचलर पार्टी’ही दिली होती. या पार्टीला दीपिकाही हजर होती, असे समजते आहे. या दोघांचे ओरलॅन्डोमधील फोटोही सोशल मीडियावर झळकले आहेत. गेल्या सात वर्षांपासून दीपिका आणि रणवीरचे डेटिंग सुरू आहे. आता त्या रिलेशनशीपला मॅरिड स्टेटस प्राप्त होण्याची वेळही जवळ आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)