ट्रिनिटी निमंत्रित क्रिकेट करंडक स्पर्धा; लीजंड्‌स क्रिकेट अकादमी संघाचा सनसनाटी विजय

पुणे – लीजंड्‌स क्रिकेट अकादमी संघाने फल्लाह क्रिकेट अकादमी संघाचा एक डाव व 220 धावांनी पराभव करताना ट्रिनिटी निमंत्रित क्रिकेट करंडक स्पर्धेत विजयी सलामी दिली. ट्रिनिटी इंजिनिअरिंग व इंजिन इनसाईट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

के. जे. इन्स्टिट्यूट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या साखळी लढतीतील पहिल्या डावात लीजंड्‌स क्रिकेट अकादमी संघाने पहिल्यांदा खेळताना 64 षटकांत 374 धावांचे आव्हान उभे केले. यात पियुष सोहने (128), दीपक गायकवाड (100) व शौनक त्रिपाठी (50) यांनी लीजंड्‌स संघाला पावणेचारशेची मजल मारून दिली. फल्लाह क्रिकेट अकादमीकडून केजन जिंदाल (4-40), आदित्य म्हस्के(2-39), उन्मेश शिरोडकर(2-40) व कुणाल नादेशन (2-108) यांनी सुरेख गोलंदाजी केली.

पहिल्या डावातील 374 धावांच्या पिछाडीवरून फल्लाह क्रिकेट अकादमी संघाचा पहिला डाव 23.3 षटकांत 89 धावांवर संपुष्टात आला. यात पेरस कांबळे (नाबाद 52) व सतीश शेळके (16) यांनी काही वेळ प्रतिकार केला. लीजंड्‌स क्रिकेट अकादमी संघाकडून शौनक त्रिपाठी (4-17), शमीत शेट्टी (2-17) व अक्षय घोरपडे(2-19) यांनी अफलातून गोलंदाजी करताना आपल्या संघाला 285 धावांची आघाडी मिळवून दिली.

लीजंड्‌स क्रिकेट अकादमी संघाच्या अचूक माऱ्यासमोर फल्लाह क्रिकेट अकादमी संघाचा दुसरा डाव 23.1 षटकांत 65 धावांवर गुंडाळला गेला. यात उन्मेश शिरोडकरने सर्वाधिक 40 धावा केल्या. लीजंड्‌स क्रिकेट अकादमीकडून अक्षय घोरपडेने 12 धावांत 5 गडी बाद करून फल्लाह क्रिकेट अकादमीचा निम्मा संघ तंबूत धाडला. अक्षयला साथ देणाऱ्या शमित शेट्टीने तीन गडी, तर ऐश्वर्य खोपकरने दोन गडी बाद करून लीजंड्‌स संघाला 220 धावांनी विजय मिळवून दिला.

 सविस्तर निकाल-

साखळी फेरी- पहिला डाव- लीजंड्‌स क्रिकेट अकादमी- 64 षटकांत सर्वबाद 374 धावा (पियुष सोहने 128, दीपक गायकवाड 100, शौनक त्रिपाठी 50, केजन जिंदाल 4-40, आदित्य म्हस्के 2-39, उन्मेश शिरोडकर 2-40, कुणाल नादेशन 2-108) विरुद्ध फल्लाह क्रिकेट अकादमी- 23.3षटकांत सर्वबाद 89 धावा (पेरस कांबळे नाबाद 52, सतीश शेळके 16, शौनक त्रिपाठी 4-17, शमित शेट्टी 2-17, अक्षय घोरपडे 2-19); पहिल्या डावात लीजंड्‌स क्रिकेट अकादमीकडे 285 धावांची आघाडी; दुसरा डाव- फल्लाह क्रिकेट अकादमी- 23.1 षटकांत सर्वबाद 65 धावा (उन्मेश शिरोडकर 40, अक्षय घोरपडे 5-12, शमित शेट्टी 3-12, ऐश्वर्या खोपकर 2-18); लीजंड्‌स क्रिकेट अकादमी 220 धावांनी विजयी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)