नवी दिल्ली: जुलैमध्ये ट्रायफेडने 204.88 लाख रुपयांच्या आदिवासी उत्पादनांची खरेदी केली आहे. गेल्या वर्षीच्या याच काळाशी तुलना करता यात 864 टक्के वाढ झाली आहे. ट्रायफेडचे किरकोळ विपणनावर लक्ष केंद्रित केल्यामुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. 23,127 आदिवासी कुटुंबांशी संबंधित 149 आदिवासी उत्पादकांकडून जुलै महिन्यातली ही खरेदी करण्यात आली असून यामुळे 64.755 आदिवासी लाभार्थींना उपजिविकेचे साधन प्राप्त झाले. जुलै महिन्यात 163.43 लाख रुपयांची विक्रमी विक्री करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)