ट्रम्प यांनी सीएनएनच्या पत्रकाराला सुनावले खडे बोल 

वॉशिंग्टन – अमेरिकेतील मध्यावधी निवडणूकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाला कनिष्ठ सभागृहात मोठे यश मिळाले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या निकालाचा चांगलाच धक्का बसला आहे. याची प्रचिती एका पत्रकार परिषदेत आली. सीएनएनचे पत्रकार जिम अकोस्टा यांनी विस्थापितांबाबतचा प्रश्न विचारताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या रागाचा पारा चढला. आणि त्यांनी या पत्रकाराला बसायला सांगितले. एवढेच नाहीतर ट्रम्प यांनी या पत्रकाराच्या हातून माईकही काढून घेण्यास सांगितले.

मध्यवर्ती निवडणुकांच्या वेळीच तुम्ही विस्थापितांचा प्रश्न का पुढे आणला? असा प्रश्न या पत्रकाराने विचारला. यानंतर ट्रम्प यांना राग अनावर झाला. त्यांनी या पत्रकाराला बसायला सांगितले. तरीही या पत्रकाराने दुसरा प्रश्न विचारला. २०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली त्यावेळी निवडणुकीत रशियाचा सहभाग होता असा आरोप होतो आहे त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? असे या पत्रकाराने विचारले. यानंतर ट्रम्प यांनी या पत्रकाराला खडे बोल सुनावले,  तू तुझा माईक बंद कर, तुझ्यासारखा माणूस जेव्हा सीएनएन सारख्या चॅनलमध्ये काम करतो ही त्या कंपनीला लाज बाळगण्यासारखी गोष्ट आहे. तुला कुठे काय बोलावं ते कळत नाही तू एक उद्धट माणूस आहेस असे ट्रम्प यांनी सुनावले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)