ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी 

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मधील दिवाळी उत्सवाचे उद्‌घाटन दीपप्रज्वलन करून केले. प्रकाशाचा अंधारावरील विजय म्हणजे सत्प्रवृत्तीचा वाईट प्रवृत्तीवरील विजयाचे प्रतिक असलेला हा उत्सव व्हाईट हाऊस मध्ये साजरा करताना आपल्याला विशेष आनंद होत असल्याचे ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले. या दिवाळी उत्त्सवासाठी व्हाईट हाऊसच्या रूझवेल्ट रूम मध्ये खास रोषणाई करण्यात आली होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले की खास लोकांच्या उपस्थितीत हा खास उत्त्सव साजरा करण्याने आपल्याला अतिव आनंद झाला आहे. भारताबरोबर अमेरिकेचे आता विशेष मैत्री संबंध प्रस्थापित झाले असून स्वातंत्र्य, शांतता आणि समृद्धीसाठी हे दोन्ही देश एकत्रितपणे प्रयत्न करतील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

-Ads-

आमच्या देशात लक्षावधी भारतीय व अशियाई नागरीक राहात आहेत त्यांनी आमचा देश अनेक प्रकारे समृद्ध केला आहे. आज या लोकांना आम्ही आमचे कुटुंबिय म्हणून सामावून घेतले आहे असे ते म्हणाले. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आपली मैत्री आहे.

आता आपली कन्या इव्हान्का ही सुद्धा मोदींची मैत्रीण आहे असे त्यांनी नमूद केले. यावेळी स्वत: इव्हान्का ही सुद्धा यावेळी उपस्थित होती. भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापारातील काही तरतूदींमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली असली तरी त्याविषयी चर्चा सुरू आहे असे ट्रम्प यांनी यावेळी नमूद केले. भारताबरोबर अधिक चांगला व्यापार करार असावा यासाठी आम्ही कसोशिचे प्रयत्न करीत आहोत असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला ट्रम्प प्रशासनातील मूळ भारतीय वंशाचे अधिकारी, तसेच खास भारतीय निमंत्रीत पाहुणे उपस्थित होते. भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना यांनाही यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. सरना यांचे विशेष सहायक प्रतिक माथूर हेही यावेळी उपस्थित होते. भारतीय नागरीकांसाठी व्हाईट हाऊसमध्ये, दिवाळी साजरी केल्याबद्दल सरना यांनी अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले.

भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री संबंधातला सर्वात चांगला काळ आम्ही सध्या अनुभवत आहोत असे त्यांनी नमूद केले त्याला ट्रम्प यांनीही दुजोरा दिला. व्हाईट हाऊस मध्ये सन 2003 सालापासून दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. जॉर्ज बुश, बराक ओबामा यांनी ही प्रथा कायम केली. तीच अध्यक्ष ट्रम्प यांनीही पुढे सुरू ठेवली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)