ट्रम्प यांनी भारताला टाकले मादकद्रव्यांचा व्यापार करणाऱ्या देशांच्या यादीत

वॉशिंग्टन – अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने जगातील मादक द्रव्ये तयार करून ती निर्यात करणाऱ्या 21 देशांच्या यादीत भारताचाही समावेश केला आहे. मादक द्रव्ये तयार करणाऱ्या अन्य आशियाई देशांच्या या यादीत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे. भारताला अमेरिकेने या द्वारे मादक द्रव्यांचा चोरटा व्यापार मोठ्या प्रमाणात करणाऱ्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या पंक्तीत बसवल्याने त्याला भारताकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्‍यता आहे.

तथापी या यादीत ज्या देशांची आम्ही नावे घेतली आहेत त्याचा त्या देशांशी असणाऱ्या संबंधांवर विपरीत परिणाम होईलच असे नाही असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की भौगोलिक, व्यापार विषयक आणि आर्थिक कारणांच्या आधारे ज्या देशांत या व्यापाराला अनुकुल संधी मिळू शकते याचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली आहे. याचा अर्थ त्या देशांचे सरकार मादक द्रव्यांच्या व्यापाराला फूस देते असा नाही. या यादीतील अनेक देशांची सरकारे मादकद्रव्याच्या नियंत्रणासाठी पुरेशी दक्षता आणि कायदेशीर उपाययोजनाही करीत आहेत हेही ट्रम्प यांनी नमूद केले आहे.

तथापी या व्यापाराला आळा घालण्यासाठी जो एक आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला आहे त्यातील तरतूदींची प्रभावी अंमलबजावणी करण्यात बोलोव्हिया, व्हेनेझुएला या सारखे देश कमीही पडले आहेत असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. या 21 देशांनी आपल्या देशातील मादकद्रव्यांच्या निर्मीतीचे आणि त्याच्या वाहतुकीचे स्त्रोतच नाहीसे करावेत अशी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

कोलंबिया, मेक्‍सिको, आणि अफगाणिस्तानातून या व्यवसायाची वाढलेली व्याप्ती अतिशय चिंताजनक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)