ट्रम्प यांनी भारताचे निमंत्रण नाकारल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा 

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय प्रजासत्ताक दिन सोहोळ्याचे निमंत्रण नाकारल्याच्या वृत्ताला व्हाईट हाऊसने आज अधिकृत दुजोरा दिला.कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना भारताच्या निमंत्रणाचा स्वीकार करता येऊ शकत नाही असे या प्रवक्‍त्याने आज स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी गेल्याच वर्षी ट्रम्प यांना हे निमंत्रण दिले होते. पण कामाच्या व्यस्ततेमुळे हे निमंत्रण स्वीकारता येऊ शकत नाही असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्‍त्याने पीटीआय या भारतीय वृत्तसंस्थेला सांगितले.

हा प्रवक्‍ता म्हणाला की भारताचा प्रजासत्ताक दिन ज्या सुमाराला आहे त्याच सुमाराला अध्यक्ष ट्रम्प यांना अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहाला संबोधीत करावे लागणार आहे. अमेरिकन अध्यक्षांचे हे भाषण जानेवारीच्या अखेरीला किंवा फेब्रुवारीच्या सुरूवातीला होत असते. त्यामुळे भारताचे हे निमंत्रण स्वीकारणे अशक्‍य बनले आहे. तथापी अध्यक्ष ट्रम्प यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आणि भारताशी अत्यंत घनिष्ट संबंध आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोदींनी अनेक बैठकांमधून तसेच फोन कॉल्स मधून अध्यक्षांशी व्यक्तीगत संपर्क प्रस्थापित केला आहे. अध्यक्ष भारताशीही घनिष्ट संबंध कायम ठेवण्यात उत्सुक आहेत असेही या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले. जरी 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे त्यांना अशक्‍य असले तरी शक्‍य तितक्‍या लवकर ट्रम्प हे पंतप्रधान मोदींशी चर्चा करण्याची संधी घेतील असेही त्यांनी नमूद केले.

अर्जेन्टिनात होणाऱ्या जी 20 परिषदेच्यावेळी 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर या कालावधीत दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्‍यता आहे. भारतीय प्रजासत्ताक सोहळ्याला बाहेरील देशाच्या राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याची प्रथा आहे. या आधी अमेरिकेचे अध्यक्ष बराक हे सन 2015 च्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)