ट्रम्प यांनी पुन्हा व्यक्त केली भारताविषयी नाराजी

वॉशिंग्टन – भारताने अनेक अमेरिकन वस्तुंवरील आयातीसाठी शंभर टक्के इतका आयात कर लागू केल्याचा विषय उपस्थित करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा नाराजी व्यक्‍त केली आहे. अशा प्रकारांमुळेच आम्हालाही संबंधीत देशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तुंवर जादा आयात कर लागू करण्याखेरीज पर्याय उरत नाहीं. व्यापारातील हा असमतोल दूर करण्याचा आम्हाला अधिकारच आहे असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे युरोप, चीन आणि भारतातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तुंवर मोठ्या प्रमाणात आम्हाला कर आकारणी करावी लागली आहे असे ते म्हणाले.

भारत आणि अमेरिका यांच्यात मंत्रिपातळीवर पुढील आठवड्यात बैठक होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी केलेल्या या विधानांना महत्व आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भारताने हॅरले-डेव्हीडसन या अमेरिकन बनावटीच्या मोटारसायकलीवर शंभर टक्के कर लागू केला होता. आम्ही त्या विषयी नाराजी व्यक्त केल्यानंतर भारताने तो कर 50 टक्कक्‍यांवर आणला आहे. परंतु तरीही भारताने केलेली ही कपात पुरेशी नाही असे ते म्हणाले. तुम्ही आमच्या मालावर जादा कर लागू करू नका मीही प्रत्युत्तरादाखल करवाढ करणार नाही असेच मी जी7 देशांच्या बैठकीत सांगितले होते. त्यावेळी माझ्या प्रस्तावाला कुणीही प्रतिसाद दिला नाही असे ते म्हणाले.

अनेक देश अमेरिकन वस्तुंवर कोणताही कर लागू न करण्यास तयार आहेत. तुम्हीही तसे करा मग कोणतेच अडथळे येणार नाहीत असेही त्यांनी नमूद केले आहे. चीन बरोबरच्या व्यापारात आमचे पाचशे अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले, युरोपियन समुदायाबरोबरच्या व्यापारात आमचे 151 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे. अशा नुकसानीमुळे आमच्याकडील शेतकऱ्यांनाही मोठे नुकसान सोसावे लागत आहे त्यांना विदेशात व्यापार करणे कठीण होंऊन बसले आहे असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)