ट्रम्प यांना विषारी पत्र पाठवणाऱ्याला अटक 

सॉल्ट लेक सिटी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेतील अन्य नेत्यांना एक विशिष्ट प्रकारचे विष (बॉयोलॉजिकल टॉक्‍सिन) लावलेली पत्रे पाठवल्याच्या आरोपावरून अमेरिकन नौदलातील एका ज्येष्ठाला पोलिसांनी अटक केली आहे.

विल्यम क्‍लाईड ऍलेन असे त्याचे नाव असून तो 39 वर्षीय आहे. अध्यक्ष आणि अन्य नेत्यांना संदेश पाठवण्याच्या इराद्याने आपण ही पत्रे पाठवल्याची कबुली त्याने दिली आहे. पण त्याला नेमका कोणता संदेश द्यायचा होता हे मात्र समजू शकलेले नाही.

-Ads-

त्यांना ही पत्रे पाठवताना स्वत:चे नाव आणि पत्ताही त्यावर लिहीला होता त्यामुळे त्याला पकडणे पोलिसांना सहज शक्‍य झाले. तो मनोरूग्ण आहे किंवा कसे हे मात्र लगेच समजू शकले नाही. त्याला कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी तो बायकोच्या आठवणीने न्यायाधिशांपुढे रडला.

आपली बायको आजारी आहे पण आज सकाळी कोर्टात येताना मी तिला बुट घालायला मदत केली असे काहीसे तो तेथे विचीत्र बडबडत होता. त्याच्या विरूद्धचा गुन्हा सिद्ध झाला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)