ट्रम्प यांच्या सहकाऱ्याला प्रचारातील गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगवास

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सल्लागार जॉर्ज पॅपाडोपोलोस यांना “एफबीआय’ला खोटी माहिती दिल्याप्रकरणी 14 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूकीदरम्यान ट्रम्प यांच्यावतीने रशियाबरोबर संगनमत केल्याच्या आरोपावरून त्यांच्या विरोधात तपास सुरू होता.

पापाडोपोलोस यांना आपल्या कृत्याचा पश्‍चाताप झाल्याची नोंद न्यायालयाने घेतली. पण त्यांनी “एफबीआय’ला खोटी माहिती दिल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे मतही न्यायालयाने व्यक्‍त केले.

रशियाबरोबरच्या संगनमताचा विशेष वकिल रॉबर्ट मुल्लर यांच्याकडून तेल्या 16 महिने तपास सुरू आहे. या प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा होणारे पापाडोपोलोस हे ट्रम्प यांचे दुसरे सहकारी आहेत. दोनच आठवड्यांपूर्वी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली ट्रम्प यांच्या आणखी दोघा निकटच्या सहकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.

या प्रकरणांमध्ये एकूण 35 जणांवर खटले सुरू आहेत. त्यापैकी 5 जणांनी आपला गुन्हा कबूल केला आहे. तर एकावर खटल्यादरम्यान आरोप सिद्ध झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)