ट्रम्प यांच्या जावयाला मिळालेल्या कर्जावर व्हाइट हाउसकडूनच चौकशी

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्या कौटुंबिक रियल इस्टेट कंपनीला 50 कोटी डॉलर्सचे (सुमारे 3242 कोटी रुपये) कर्ज मिळाले आहे. याप्रकरणी व्हाइट हाउसने चौकशी सुरु केली आहे. या प्रकरणी आचारसंहिता किंवा गुन्हेगारी कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे का याचा शोध घेतला जात आहे.

व्हाइट हाउस वकील कार्यालयाने याप्रकरणी चौकशी करण्यास सांगितल्याची माहिती शिष्टाचार विभागाचे संचालक डेव्हिड जे. एपोल यांनी खासदार राजा कृष्णमूर्ती यांना दिली. कुशनर यांच्या कंपनीला अपोलो ग्लोबल मॅनेजमेंटकडून मागील वर्षी 18.4 कोटी डॉलर्स तर सिटी ग्रूपकडून 32.5 कोटी डॉलर्सचे कर्ज मिळाले होते. या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची कुशनर यांनी भेट घेतल्यावर हा निर्णय झाला होता. कुशनर ट्रम्प यांचे मुख्य सल्लागार देखील आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)