ट्रम्प यांच्यावर लवकरच महाभियोगाची शक्‍यता

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या माजी वकिलाने ट्रम्प यांच्याच सूचनेवरून निवडणूक प्रचार काळादरम्यान आर्थिक गुन्हा केल्याचा कबुलीजबाब दिल्यामुळे आगामी काही महिन्यातच ट्रम्प यांच्यावर महाभियोगही चालवला जाऊ शकणार आहे. ट्रम्प यांचे प्रचार प्रमुख राहिलेल्या मायकेल कॅपुटो यांनी ही शक्‍यता वर्तवली आहे.

कोहेन यांना मंगळवारी आर्थिक गुन्ह्यांच्या 8 आरोपांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामध्ये करचुकवेगिरी, बॅंकांना खोटी माहिती देणे आणि प्रचार नियमांचा भंग आदी आरोपांचा समावेश आहे. पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनिएलसह दोन महिलांना लाच स्वरुपात पैसे दिल्याच्या आरोपातही कोहेन दोषी आढळले आहेत.

अध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या ट्रम्प यांच्याशी कथित अफेअरबाबत या महिलांनी गप्प रहावे यासाठी हे पैसे दिल्याचा कोहेन यांच्यावर आरोप आहे. तसेच ट्रम्प यांचे माजी प्रचार व्यवस्थापक पॉल मॅनफोर्ट हे देखील न्यूयॉर्क आणि व्हर्जिनियातील कोर्टांमध्ये दोषी आढळले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत रशियाच्या एजंटची मदत घेतली गेल्यासंदर्भात “एफबीआय’ने ठेवलेल्या आरोपांमध्ये ते दोषी आढळले आहेत. ट्रम्प आणि रशिया दोघांनीही हे आरोप फेटाळले आहेत.

न्यूयॉर्कच्या साऊथ डिस्ट्रीक्‍टमधील मुदतपूर्व निवडणूकीत डेमोक्रॅटिक पक्ष विजयी झाल्यास या आरोपांच्या आधारे ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवला जाऊ शकतो. हा महाभियोग पहिल्या तिमाहीमध्येही होऊ शकेल, असे कॅपुटो म्हणाले. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मुदतपूर्व निवडणूका ट्रम्प यांच्यासाठी महत्वाच्या असणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)