ट्रम्प यांच्याबरोबरची भेट रद्द करण्याचा उत्तर कोरियाचा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेने दक्षिण कोरियाबरोबर युद्ध सराव करण्याचे योजले आहे. त्याला उत्तर कोरियाने तीव्र आक्षेप घेतला असून अमेरिकेने हा सराव रद्द केला नाही तर उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संभाव्य बैठकच रद्द करण्याचा इशारा उत्तर कोरियाने दिला आहे. अमेरिकेबरोबर होंणाऱ्या युद्ध सरावाचा निषेध म्हणून उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाबरोबरची शिखर बैठकही रद्द केल्याची घोषणा केली आहे.

उत्तर कोरियाने आज अचानकपणे दिलेल्या या धमकी मुळे येत्या 12 जुनला सिंगापुर येथे होणारी किम जोंग आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच्या बैठकीविषयी साशंकता निर्माण झाली आहे.

उत्तर कोरिया इतक्‍यातच जागतिक समुदायाच्या बरोबर जाण्याच्या मनस्थितीत होता. दक्षिण कोरियाबरोबरचा आपला संघर्षही त्यांनी कमी करीत आणला होता. पण अचानक या संयुक्त लष्करी सरावाच्या कारणाने साऱ्या प्रयत्नांवर पाणी फिरण्याची शंका निर्माण झाली आहे, दरम्यान उत्तर कोरियाने नव्याने जो इशारा दिला आहे त्याच्याकडे आम्ही स्वतंत्रपणे पहात आहोत. त्यांचे नेमके म्हणणे लक्षात घेऊनच आम्ही त्यावर आमची भूमिका स्पष्ट करू असे अमेरिकेने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)