कोलंबीया – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्याच्या निवेदनावर अमेरिकेतील सात गव्हर्नर्सनी स्वाक्षरी केली आहे. या गव्हर्नन्सनी नोबेल पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष बेरीट अँडरसन यांना तसे निवेदनही पाठवले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की ट्रम्प यांनी निशस्त्रीकरणाच्या विरोधात अत्यंत ठाम भूमिका घेतली.

याबाबतीत आडमुठे धोरण स्वीकारणाऱ्या उत्तर कोरियालाही त्यांनी चर्चेच्या मार्गावर आणले तसेच दोन्ही कोरियांमध्ये शांतता सहकार्य आणि मैत्रीचे वातावरण निर्माण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. या आधी ट्रम्प यांच्या 18 समर्थक संसद सदस्यांनीही तसेच निवेदन नोबेल निवड समितीला सादर केले आहे. अमेरिकन गव्हर्नन्सना नोबेल पुरस्कारा साठी शिफारस पाठवण्याचा अधिकार नाही आणि त्यांच्या शिफारशीला नोबेल निवड समिती अधिकृत समजत नाही पण तरीही या समितीवर दबाव आणण्याचा भाग म्हणून ट्रम्प समर्थक गव्हर्नन्सनही हे निवेदन पाठवण्याची खेळी केली आहे. त्यातून त्यांची या नावासाठी चर्चा सुरू झाली आहे हा या पत्राचा महत्वाचा उपयोग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)