ट्रम्प यांचे निर्णय देशाला हानिकारक – अमेरिकन अधिकारी

वॉशिंग्टन्‌ (अमेरिका) – अध्यक्ष ट्रम्प यांचे निर्णय देशाला हानिकारक सिद्ध होऊ शकतील असे एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करता म्हटले आहे. सदर अधिकारी ट्रम्प प्रशासनाच्या सेवेत आहे. ” प्रशासनाचा अंतर्गत विरोधक’ अशा नावानेच त्याने हा लेख लिहिला आहे. आपण आतील विरोधक असल्याचे प्रतिपादन करत त्याने एका वृत्तपत्रात लेख लिहून आपली मते व्यक्त केली आहेत. मात्र व्हाईट हाऊसने अधिकाऱ्यांची ही कृती भ्याडपणाची असल्याने म्हटले आहे.

आम्हाला अमेरिकन प्रशासन यशस्वी झालेले हवे आहे, आमची धोरणे अगदी सुरुवातीपासून देश सुरक्षित आणि समृद्ध बनण्यासाठीची आहेत. आम्ही प्रथम देशासाठी काम करतो, कोणा व्यक्तिवविशेषसाठी आम्ही काम करत नाही. असे सांगून त्याने प्रश्‍न केला आहे, की ट्रम्प यांची धोरणे राबवणारे, ट्रम्प यानी नियुक्त केलेले अधिकारी आमची लोकशाही कशी वाचवतील? आता ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, त्या केवळ ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असेपर्यंतच चालणार आहेत असे या अधिकाऱ्याने सांगितले.

ट्रम्प यांना स्वत:प्रमाणेच असलेले ब्लादिमीर पुतीन आणि किम जोंग ऊन यांच्यासारखे हुकूमशहाच आवडतात. टृम्प हे रिपब्लिकन म्हणून जिंकले असले, तरी ते कॉन्झरवेव्टिव्हना जास्त जवळचे आहेत. असे त्याने म्हटले आहे. आपल्यावरील सर्व आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट करून लेख लिहिणाराने सर्व चुकीची कारणे दिलेली असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाने केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)