ट्रम्प यांचे नवे नासा प्रमुख थोडक्‍यात बचावले

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नासा या अमेरिकन अंतरीक्ष संशोधन संस्थेच्या प्रमुखपदी जीम ब्रिडेनस्टाईन यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीला अमेरिकन सिनेट मध्ये अगदी थोडक्‍या बहुमताने मान्यता मिळू शकली आहे. या विषयावर घेण्यात आलेल्या मतदानात ब्रिडेनस्टाईन यांच्या नियुक्तीला 50 जणांनी मान्यता दिली पण त्यांच्या विरोधात तब्बल 49 मते पडली. म्हणजेच केवळ एकच मतांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता मिळाल्याने ते थोडक्‍यात बचावल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ओक्‍लहोमा येथील संसद सदस्य असलेले ब्रिडेनस्टाईन हे नासाचे 13 वे प्रशासकीय प्रमुख असतील. तथापी त्यांना अंतरीक्ष संशोधन क्षेत्रातली फारशी माहिती नसल्याने त्यांना या पदावर नियुक्त करण्याला अनेक संसद सदस्यांचा विरोध होता. त्यामुळे अत्यंत कमी मताधिक्‍क्‍याने ते या पदासाठी पात्र ठरले आहेत. आपल्या प्रस्तावांना आणि नियुक्‍त्यांना डेमोक्रॅटिक सदस्यांकडून संथ साथ मिळत असल्याबद्‌ल ट्रम्प यांनी ट्विटर संदेशात नाराजी व्यक्त केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)