ट्रम्प यांचा व्हेनेंझएुलाला दणका – डिजीटल करन्सीवर घातले निर्बंध

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी व्हेनेन्झुएलाला दणका दिला आहे. सोमवारी व्हेनेन्झुएलाच्या डीजिटल करन्सीवर त्यांनी निर्बंध घातले आहेत. या संबंधीचा ट्रम्प यांचा कार्यकारी आदेश म्हणजे व्हेनेन्झुएलाचा अमेरिकेच्या वित्तीय बाजाराशी संबंध तोडणारा असल्याचे मानले जात आहे.

शिन्हुआ या चिनी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार व्हेन्झुएलाला अमेरिकन नागरिकाबरोबर आणि अमेरिकेत आर्थिक व्यवहार करता येणार नाही. अमेरिकन सरकारने लादलेले निर्बंध निष्फळ करण्याच्या व्हेनेन्झुएलाच्या प्रयत्नांना शह देण्यासाठी आहेत.

फेब्रुवारीच्या अखेरीस व्हेनेन्झुएला सरकारने आपल्या क्रिप्टो करन्सीची पूर्व विक्री सुरू केली होती. ही एक क्रिप्टो करन्सी, डीजिटल मुद्रा आहे. अमेरिकन निर्बंधांना पर्याय म्हणून क्रिप्टो करन्सी सुरू करण्यात आली होती.

अमेरिकेने व्हेनेन्झुएलावर घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांचे उल्लंघन होऊ शकते, असे अमेरिकेच्या अर्थ विभागाने म्हटले आहे. पण आर्थिक निर्बंधांचे उल्लंघन करणारांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही सूचित केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)