ट्रम्प यांचा ‘भारतदौऱ्यावर’ येण्यास नकार

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास सपशेल नकार दिला आहे. अमिरिकेने इराणवर टाकलेल्या निर्बंधांनंतरही भारताने सुरु ठेवलेली तेल खरेदी, आणि भारताने रशियाशी साधलेली जवळीक या कारणांमुळे भारत आणि अमेरिकेचे संबंध मागच्या काही काळापासून ताणले गेले आहेत.

आता याच पार्शवभूमीवर अमेरिकन अधिकाऱ्यांनी भारताचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल यांच्याकडे ट्रम्प भारतात येणार नसल्याचे पत्र सुपूर्द केले आहे. ट्रम्प यांनी भारत दौरा रद्द करताना त्यांच्या राजकीय वेळापत्रकाचा हवाला दिला असला तरी देखील यामागील खरे कारण अमेरिकेची भारताच्या धोरणांप्रती असलेली नाराजी हेच आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय समजले जाणारे डोनाल्ड ट्रम्प यांनीच ऐनवेळी भारत दौरा रद्द केल्याने मोदींसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)