ट्रम्प यांचा इराणच्या बाबतीत युरोपिय देशांना ईशारा

वॉशिंग्टन: अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध जारी केले आहेत. परंतु तरीही ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली वेगळ्या मार्गाने पेमेंट करण्याच्या सिस्टीमचा वापर करून काही युरोपिय देश इराणशी आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपिय देशांना असले धाडस करू नका असा इशारा दिला आहे.

आम्ही इराणवर घातलेले निर्बंध तुम्ही झुगारून देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो असेही ट्रम्प यांनी त्यांना दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे. इराणशी वेगळ्या मार्गाने आर्थिक व्यवहार करण्यासाठीची नवीन सिस्टीम लवकरच आम्ही जाहींर करणार आहोत असे युरोपियन देशांच्या संघटनेने अलिकडेच म्हटले होते त्यावर ट्रम्प यांनी त्यांना हा सज्जड इशारा दिला आहे. तथापी या विषयावर अमेरिकेशी बोलून मार्ग काढू असे युरोपियन युनियनच्यावतीने सांगण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)